Breaking News

Tag Archives: RTI activist

सर्व्हिस रोडसाठीही १६०० कोटी रूपयांची निविदा मुंबई महापालिकेची सर्व्हिस रोडच्या कॉक्रेटीकरणासाठी निविदा काढली

सर्व्हिस रोड हा अवजड वाहनांसाठी वापरला जात नाही. तसेच त्याचा वापर स्थानिक नागरिकांच्या छोट्या वाहनांसाठी केला जातो. तरीही सर्व्हिस रोडचे कॉक्रेटीकरण करण्यासाठी १६०० कोटी रूपयांची निविदा काढण्यात आली आहे. यासदंर्भात सर्व्हिस रोडचे कॉक्रेटीकरण करण्याची आवश्यकता नसताना ही निविदा का काढण्यात आली असा सवाल करत ही निविदा रद्द करत प्रचलित नियमानुसार …

Read More »

मध्य रेल्वेने ४ महाकाय होर्डिंग काढले तर १४ होर्डिंगचा आकार केला कमी आरटीआय कार्यकर्त्ये अनिल गलगली यांची माहिती

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य रेल्वेने ४ महाकाय होर्डिंग काढले तर १४ होर्डिंगचा आकार कमी केली असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वेने दिली आहे. तर पश्चिम रेल्वेने मागितलेली माहिती स्पष्ट नसल्याचे सांगत कारवाईची माहिती दिली नाही. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मध्य रेल्वेकडे सर्वोच्च न्यायालयाच्या …

Read More »

मुकेश अंबानी सहित ५ थकबाकीदाराने एमएमआरडीएचे थकविले ५,८१८ कोटी आरटीआय कार्यकर्त्ये अनिल गलगली यांची माहिती

जगात श्रीमंतीत ११ व्या स्थानी आणि भारतात प्रथम असलेले उद्योगपती मुकेश अंबानी यांनी एमएमआरडीएचे ४३८१ कोटी थकविले आहेत. अंबानी सहित अन्य ५ थकबाकीदार आहेत त्यांची एकूण थकबाकी ५,८१८ कोटी असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे थकबाकीदार यांना दिलेली …

Read More »

मुंबई महापालिकेचा अजब कारभार, एका निविदेत कंपनी अपात्र तर दुसऱ्यात पात्र एकीकडे अपात्र असलेल्या कंपन्या दुसऱ्या निविदेत पात्र कशा

मुंबई महानगरपालिकेतील परिमंडळ ६ आणि ५ अंतर्गत २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षासाठी खराब झालेले/कोसळलेले, मोठे आणि रस्त्याच्या कडेचे नाले/नाल्याच्या भिंर्तीच्या दुरुस्ती/पुनर्बाधणीच्या अप्रत्याशित कामांसाठी कंत्राटी एजन्सीच्या निविदेत एकप्रकारचा चमत्कार झाला आहे. एका निविदेत अपात्र असलेल्या कंपन्या दुसऱ्या निविदेत पात्र झाली असून याबाबत चौकशी करत पुन्हा योग्य निविदा जारी करण्याची मागणी आरटीआय …

Read More »

आदर्श आचारसंहिता असतानाही नवी मुंबई महानगरपालिकेत ५० कोटींच्या कामाचे वाटप वादग्रस्त संजय देसाई यांनी सेवानिवृत्त आधी केला पराक्रम

संपूर्ण महाराष्ट्रात निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू असुनही नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रभारी शहर अभियंता संजय देसाई यांनी ५० कोटींची निविदा उघडण्याचे धाडस दाखविले. नवी मुंबई महानगरपालिकेत ५० कोटींच्या कामाचे वाटप करताना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी निवडणूक आयोगाकडे करत निविदा रद्द करत गुन्हा दाखल करण्याची …

Read More »

राजभवनात टपाल पोचवर निर्बंध

राजभवनात टपाल पोचवर निर्बंध आणले असून केवळ दुपारी ३ ते ४ या १ तासाच्या कालावधीत पोच दिली जाते. शासकीय कामकाजाच्या दिवसामध्ये कार्यालयीन वेळेत टपाल द्यावयाचे असल्यास टपाल पेटीत टाकण्याचा सल्ला वजा फलक राजभवनातील सुरक्षा कार्यालयात लावला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल रमेश बैस यांस २० फेब्रुवारी २०२४ रोजी …

Read More »

मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या खर्चात २१९२ कोटींची लक्षणीय वाढ

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच नवी मुंबईतील प्रदेशाचा विकास करण्याच्या दृष्टीने कार्यरत मुंबई पारबंदर प्रकल्पाच्या मूळ खर्चात २१९२ कोटींची लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत २ वेळा डेडलाईन चुकविणा-या कंत्राटदारांवर कोणत्याही दंड आकारला गेला नसून अजूनही १०० टक्के काम पूर्ण न झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने …

Read More »

अनधिकृत शाळांची यादी तर जाहिर पण ना दंड आणि गुन्हा मुंबई महानगरपालिकेची हाताची घडी तोंडावर बोट

मुंबई महानगर पालिका प्रत्येक वर्षी अनधिकृत शाळेची यादी जाहीर करते पण नियमाप्रमाणे दंड आणि गुन्हे दाखल केले जात नाही. दाखल केलेला गुन्हा आणि दंडाची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी विचारली असता कार्यवाही सुरु असल्याचे थातुर मातुर उत्तर शिक्षण खात्याने दिले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेच्या शिक्षण खात्यास …

Read More »

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये तब्बल १७९७ ‘ही’ पदे रिक्त

मुंबई महानगरपालिकेतील शाळा अंतर्गत शिपाई, हमाल आणि माळी – रखवलदार यांची पदे मोठया प्रमाणावर रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस शिक्षणाधिकारी कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहिती उघडकीस आले आहे. पालिका शाळेत शिपाईची एकूण १७९७ पदे रिक्त आहेत. तर ३९१ हमाल आणि १२२ माळी नि रखवलदारांची पदे रिक्त आहेत. …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या राजकीय निर्णयाच्या विरोधात मुंबईवर एकटवले मुंबईतील खुल्या जागा, खेळाचे मैदान आणि मनोरंजन मैदानाचे सद्याचे धोरण बदलण्याची हालचाल

मुंबईतील खुल्या जागा, खेळाचे मैदान आणि मनोरंजन मैदानाचे सद्याचे धोरण बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्त यांस आदेश जारी केले असून त्याविरोधात बॉम्बे कॅथोलिक सभेने एका सभा माहिम येथील सेंट मायकल सभागृहात आयोजित करण्यात आले होते. खाजगी संस्थेस किंवा व्यक्तीस दत्तक देण्याऐवजी शासन आणि पालिकेने या जागेच्या परिरक्षण करण्यावर सर्व वक्त्यांनी भर …

Read More »