Tag Archives: sambhaji bhide

संभाजी भिडेच्या अटकेसाठी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्महत्येचा प्रयत्न राहुरी तालुक्यातील रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता गणेश दिपक पवार

मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथील दलित समुदायाच्या विरोधात दंगल घडविल्याप्रकरणी शिव प्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडेला अटक करण्याच्या मागणीसाठी एका दलित कार्यकर्त्याने बुधवारी दुपारी मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सदर दलित कार्यकर्ता हा रिपब्लिक सेनेचा कार्यकर्ता असून गणेश दिपक पवार असे नाव असल्याचे समजते. संपूर्ण …

Read More »

भिमा कोरेगाव दंगलीतील साक्षीदार पूजा सकट हिची आत्महत्या की हत्या ? सखोल चौकशीची प्रवक्ते महेश तपासे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगाव दंगलीतील मुख्य साक्षीदार असलेल्या पूजा सकट हिचा संशयास्पद मृत्यू झाला असून तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याची सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. भीमा कोरेगाव दंगलीमध्ये ज्या पूजा सकट हिच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. …

Read More »

भिडे-एकबोटे : महिला कार्यकर्त्यांना सोशल मिडीयावर शिव्यांची लाखोली सावळे आणि अंधारे यांना पोलिस संरक्षण देण्याची भीम आर्मीची मागणी

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगाव येथील दलित हिंसाचाराच्या प्रकरणी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. तसेच त्याचा पाठ पुरावा करत असल्याने याप्रकरणातील तक्रारकर्त्या आणि दलित कार्यकर्त्या अनिता सावळे आणि सामाजिक विषयांना वाचा फोडणाऱ्या प्रा. सुषमा अंधारे यांच्या विरोधात सोशल मिडीयावर सध्या ट्रोलिंग …

Read More »

संभाजी भिडेला मुख्यमंत्र्यांची क्लीन चीट आणि सोशल मिडीयावर पुराव्यांची लाट दलित, मराठा समाजाकडून संताप

मुंबई: प्रतिनिधी भिमा कोरेगाव येथील दंगलप्रकरणी मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या विरोधात कोणताही पुरावा सापडला नसल्याची घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत क्लीन चीट दिली. मात्र ही क्लीन चीट दिल्यापासून संभाजी भिडे यांची संघटना आणि त्यांच्या संघटनेच्या धारकऱ्यांचे पुरावे देण्याची लाटच सोशल मिडीयावर आली असून मुख्यमंत्री हा घ्या …

Read More »

भिमा कोरेगांव प्रकरणी भिडेंचा सहभाग नसल्याचा मुख्यमंत्र्याचा खुलासा विधानसभेतील चर्चेला उत्तर देताना माहिती

मुंबई : प्रतिनिधी १ जानेवारी २०१८ रोजी भिमा कोरेगांव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविला. मात्र गुन्ह्याच्या अनुषंगाने संभाजी भिडे यांचा सहभाग असल्याबाबतचा तपास केला. तसेच त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले. मात्र त्यांचा कोणताही सहभाग असल्याचे आतापर्यंत आढळून आले नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. …

Read More »

पंतप्रधान मोदी, आमच्या नादीला लागू नका ! एल्गार मोर्चाच्या समारोपाप्रसंगी अँड. प्रकाश आंबेडकर यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी देशाचा रखवालदार म्हणवून घेणाऱ्या रखलवादाराकडून आता रखवालदारी काढून घेण्याची वेळ आली असून या रखवालदाराला एकच सांगतो आमच्या नादी लागू नको. आम्ही फकीर आहोत. त्यामुळे आम्ही उद्या जेलमध्ये गेलो, तरी फरक पडणार नाही. मोदींना असे वाटत असेल शिवाजी महाराजांच्या जयंतीला भिडे आणि स्वत:च फोटो टाकले म्हणजे झाले. मोदी, …

Read More »

आठ दिवसांत भिडेंवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन अॅड. प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला अल्टीमेटेम

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगाव येथील दलितांवर झालेल्या हिंसाचाराप्रकरणातील सुत्रधार संभाजी भिडे याच्यावर पुढील आठ दिवसात कारवाई करण्यात आली नाही. तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा एल्गार मोर्चाचे निमंत्रक तथा भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकर यांनी देत राज्य सरकारला आठ दिवसाचा अल्टीमेटम दिल्याचेही त्यांनी सांगितले. संभाजी भिडेला अटक करण्याच्या मागणीवरून एल्गार …

Read More »

शेवटी एल्गार मोर्चा निघालाच ! जिजामाता उद्यानापासून मोर्चा निघाला आझाद मैदानाकडे

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगाव दंगल प्रकरणातील आरोपी संभाजी भिडेंना अटक करण्यात यावी या मागणीसाठी आंबेडकरी बांधवांनी काढलेल्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मात्र तरीही वेळीच माहिती पोहोचली नाही. त्यामुळे हजारो कार्यकर्त्ये जिजामाता उद्यानाजवळ पोहोचले आणि तेथूनच या दलित समाजाने मोर्चाला सुरुवात केली. त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आझाद मैदानाच्या दिशेने जाण्यास सुरुवात …

Read More »

भिडेमुळे सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचा आहे का ? विधान परिषदेत धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

मुंबई : प्रतिनिधी भीमाकोरेगाव प्रकरणाच्या दंगलीमधील आरोपी एकबोटे स्वत:हून अटक झाला. मात्र दुसरा आरोपी संभाजी भिडे याला अटक करण्यात आली नाही याचा अर्थ सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला. संभाजी भिडेला अटक होत नाही तोपर्यंत असे मोर्चे निघणार आहेत. संभाजी भिडे …

Read More »

संभाजी भिडेवरून संभाजी ब्रिगेडमध्ये फूट ? प्रवीण गायकवाड नव्या ब्रिगेडचे अध्यक्ष

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगांव हिंसाचारप्रकरणी अँट्रोसिटी गुन्हा दाखल असलेले संभाजी भिडे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी अँड. प्रकाश आंबेडकर यांनी एल्गार मोर्चा काढला. मात्र संभाजी ब्रिगेडमध्येच संभाजी भिडे यांना माननारा मोठा वर्ग असल्याने एल्गार मोर्चास पाठिंबा देण्यास या वर्गाकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. तर काहीजणांनी एल्गार मोर्चाला पाठिंबा दिल्याने शेकापमध्ये …

Read More »