Tag Archives: shinde-Fadnavis government

शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे निवडणूकांना आयोगाची स्थगिती राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय कारणीभूत ठरला

राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणूका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली. मात्र नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील जागांबाबत शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय घेतला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया जाहिर केलेल्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा स्थगिती देण्याची पाळी राज्य निव़डणूक आयोगावर आली. त्या अनुशंगाने आज स्थगिती आदेश …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे-फडणवीस सरकारला दणका, एकही झाड तोडायचे नाही महाविकास आघाडीच्या निर्णय बदलानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मुंबईचे पर्यावरण राखण्याच्या उद्देशाने आणि भविष्यकाळातील मेट्रो कारशेडचा प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने आरे येथील मेट्रो कारशेड हलविण्याचा निर्णय घेतला. मात्र महाविकास आघाडी सरकारला घालवून टाकत राज्यात नव्याने आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने मविआ सरकारचा तो निर्णय रद्दबादल करत पुन्हा आरे मध्येच मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतला. मात्र या विरोधात पर्यावरण प्रेमींनी …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारने जिल्हा परिषदेतील संख्याही घटविली महाविकास आघाडी सरकारचा निर्णय फिरविला

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आग्रहाखातर जिल्हा परिषदांमधील सदस्य संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना आपली राजकिय ताकद वाढण्यास मदत होणार होती. मात्र महाविकास आघाडी सरकार जाताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …

Read More »

उध्दव ठाकरेंचा निर्णय फिरवत शिंदे सरकारने महापालिका नगरसेवकांची संख्या घटविली मुंबईत २३६ ऐवजी २२७ नगरसेवक राहणार अन्य महापालिकेतील नगरसेवक संख्या कमी होणार

तत्कालीन उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागाने मुंबईसह राज्यातील सर्व महापालिकांमधील सदस्य संख्या वाढीचा निर्णय आज शिंदे-फडणवीस सरकारने रद्दबातल ठरवित २०१७ साली झालेल्या निवडणूकांमध्ये असलेल्या जागा इतकीच सदस्य संख्या ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री …

Read More »

ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्याचे पाप भाजपाचेच काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांचा आरोप

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांमध्ये इतर मागास वर्गीयांना (ओबीसी) राजकीय आरक्षणास मुकावे लागणार आहे. कोर्टात योग्य बाजू मांडण्यात शिंदे-फडणवीस सरकार कमी पडल्याने या निवडणुका ओबीसी आरक्षणशिवायच होणार आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्यास भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी केला. भारतीय जनता पक्ष …

Read More »

औरंगाबाद नामांतराचा शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय उच्च न्यायालयात एक ऑगस्टला होणार उच्च न्यायालयात सुनावणी

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आपल्या अखेरच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यात सत्तांतर होत बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले. या सरकारने उध्दव ठाकरेंच्या नामांतराच्या निर्णयाला स्थगिती देत त्यासंदर्भातील निर्णय नव्याने घेत तो राज्य …

Read More »

मविआकडून राहिलेल्या प्रस्तावावर अखेर शिंदे-फडणवीस सरकारने घेतला निर्णय ग्राहकांसाठी प्रिपेड / स्मार्ट मिटर बसविणार

राज्यातील मविआ अर्थात महाविकास आघाडी सरकारचा उत्तम पण आस्ते कदम सुरु असलेल्या कारभारामुळे मविआच्या विरोधात काही गोष्टी सुरु असल्याची कल्पना मविआच्या नेत्यांना कदाचित नव्हती. त्यामुळे स्मार्ट मीटर आणि प्रिपेड मीटर बसविण्याच्या प्रस्तावाची फाईल अंतिम मंजूरीसाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पोहोचली आणि सारेच वातावरण बदलले. त्यामुळे महाविकास आघाडीने तयार कलेल्या …

Read More »

अजित पवार यांचा सवाल, बहुमताचे सरकार आहे ना, मग अधिवेशन का घेत नाही? शिंदे-फडणवीस सरकारवर उठविली टीकेची झोड

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत बंडखोरांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाच्या पाठिंब्याने सरकार स्थापनापन्न झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातत्याने आमचे सरकार हे बहुमताचे आणि जनतेचे सरकार असल्याचा दावा करत आहेत. मात्र महिना …

Read More »

मंत्रिमंडळ विस्तारांवरून शरद पवार यांचा शिंदे-फडणवीसांना टोला, सत्ता दोघांनाच… एक केंद्रीत सत्ता करायची असल्याने कारभार पहात आहेत

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत बंडखोर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. मात्र या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून सत्ता स्थापन होवून एक महिना होत आला तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

संजय राऊत म्हणाले, दोघाचंच मंत्रिमंडळ पाह्यला का? बेकायदेशीर आहे माझी टीका झोंबते ना पण मी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्यावतीने बोलतोय

राज्यातील महाविकास आघाडीला घालवून शिंदे-फडणवीस यांचे सरकार नव्याने स्थानापन्न झाले. या नव्या सरकारला राज्यात येवून १५ दिवस होवून गेले. तरी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याच मंत्रिमंडळाने आतापर्यत दोनवेळा मंत्रिमंडळ बैठक घेत निर्णय घेतले. यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी …

Read More »