Tag Archives: Shivsena (Shinde Faction)

महायुतीचे उमेदवार जाहीर, अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, मिलिंद देवरा, डॉ गोपचडे

राज्याच्या राजकारणात काँग्रेसकडून काहीसे अडगळीत गेलेल्या माजी खासदार मिलिंद देवरा आणि सध्या मराठवाड्यातील मराठा विरूध्द ओबीसी राजकारणात स्पष्ट भूमिका न घेणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आगामी खासदारकीचे तिकिट मागील महिन्यातच बुक करून ठेवले. तर काही …

Read More »

उदय सामंत यांचा आरोप, घोसाळकर यांच्यावर झालेला गोळीबार हा पक्षांतर्गत गँगवॉर

उबाठा पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे. मात्र घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रकार जो विरोधक करत आहेत तो अत्यंत दुर्दैवी आहे, त्याचा मी निषेध करतो. कारण उबाठा गटातील अंतर्गत गँगवॉरमुळे मॉरिस नोरान्हो याने घोसाळकरांची हत्या केली आहे. या दोघांमध्ये …

Read More »

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर, साईबाबा ताकद दाखवेल…

लोकसभा निवडणूकांची आचारसंहिता अद्याप जाहिर झालेली नसतानाच राज्यात विविध राजकिय पक्षांनी निवडणूक मोर्चेबांधणी आणि प्रचाराला सुरुवात केलेली आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने कोकण दौरा सुरु केला आहे. या दौऱ्यात कणकवली येथील विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका केली. परंतु उद्धव …

Read More »

भाजपा आमदार गोळीबार प्रकरणी विजय वडेट्टीवार यांचा खोचक टोला, मोदींची गॅरंटी

मुंबई उपनगरातील भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. त्यानंतर गणपत गायकवाड यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी फोनवरून बोलताना गोळीबाराच्या घटनेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खासदार डॉ …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा हल्लाबोल, हिंदू-मुस्लिम प्रमाणेच मराठा आणि ओबीसी समाजात…

विद्यमान सरकारकडून ज्या प्रकारे हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजांमध्ये ज्या प्रमाणात वाद निर्माण करून वेगवेगळे केले आहे त्याचप्रमाणे सरकारकडून मराठा आणि ओबीसी यांना वेगवेगळे करण्याचं काम करत आहे याचं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करतो असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. पुढे …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, भुजबळांची सरकारने माफी मागावी, संजय गायकवाडांना निलंबत करा

राज्यातील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल ज्या पद्धतीने अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरण्यात आली, त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री असलेले भुजबळ हे मागासवर्गीय समाजाचे आहेत म्हणूनच त्यांच्याबद्दल शिविगाळ करणारी भाषा वापरण्यात आली आहे, ही मानसिकता भारतीय जनता पक्षाची आहे. भुजबळांबद्दल जी भाषा वापरली त्याबद्दल सरकारने माफी मागावी …

Read More »

शिंदे गटाचे खासदार ठाम, आपण २२ जागांचीच भाजपाकडे मागणी करायची ठाकरे गटाच्याही जागांवर दावा करणार

शिवसेना कोणाची यावरील निर्णय अद्याप सर्वोच्च न्यायालय आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रलंबित असताना लोकसभा निवडणूकीला आता काही महिन्यांचा अवधी राहिला आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या गटाच्या खासदारांची बैठक झाली. या बैठकीत शिंदे गटाच्या खासदारांबरोबरच विद्यमान ठाकरे गटाच्या खासदारांच्या जागा भाजपाकडे मागणी करायच्याच अशी …

Read More »

त्या तीन आमदारांवरील कारवाईसाठी ठाकरे गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात? विधान परिषदेतील तीन आमदारांवरील कारवाईसाठी आग्रही

शिवसेना आमदारांच्या अपात्र आमदारांवरील कारवाई संदर्भातील सुनावणी लवकरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार कारवाई उशीराने का होईना जलद गतीने होताना दिसत आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे राज्याच लक्ष लागलं आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडून विधान परिषदेच्या तीन आमदारांच्या बाबत निर्णय कधी होणार हा सवाल …

Read More »

अपात्रतेच्या मुद्दाप्रकरणी शिंदे आणि ठाकरे गटाच्या आमदारांना दोन आठवड्यांची मुदत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती

आमदारांच्या अपात्रतेसंबंधी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेल्या सुनावणीत काही निर्णय होईल अशी अपेक्षा होती, मात्र या प्रकरणी आमदारांना दोन आठवड्यांचा अवधी वाढवून मिळाला आहे. या मुदतवाढीसाठी न मिळालेल्या कागदपत्रांबरोबरच गणेशोत्सवाचे कारण पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या आमदारांना गणपती पावला असे म्हटले जात …

Read More »

अनिल परब म्हणाले, ते १६ आमदार अपात्र ठरणार शिवसेना ठाकरे गटाकडून दावा कायम

गुरुवारपासून मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरु होणार आहे पक्षांतर्गत बंदी बाबत सर्व असलेले नियम आता स्पष्ट आहेत. यामुळे सध्या सरकार वाचवण्यासाठी वेळ काढूपणा सुरु असून हे १६ आमदार अपात्र होणार असल्याचा दावा करतानाच भाजपने सरकार वाचविण्यासाठीच राष्ट्रवादीत फूट घडवून आणली असा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला …

Read More »