सोयाबीन, मूग आणि उडीद या शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ केली आहे. या खरेदीसाठी नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबरपासून सुरू होत असून कापूस खरेदीसाठी ‘कपास किसान’ अॅपद्वारे नोंदणी १ सप्टेंबर २०२५ पासून सुरू आहे. शेतकऱ्यांनी ॲपद्वारे अथवा खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. एमएसपीनुसार पूर्ण रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल ,” …
Read More »सचिन सावंत यांचा आरोप, मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक सोयाबीनला प्रति क्विंटल ६,००० रुपये हमीभावाची मागणी करणारे फडणवीस सत्तेत असूनही भाव का देत नाहीत ?
मोदी सरकारने या वर्षी सोयाबीनसाठी केवळ ५३२८ रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे. परंतु २०१३ साली भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी दिंडी काढून सोयाबीनला ६,००० रुपये हमीभाव देण्याची मागणी केली होती. त्या दिंडीला आज १२ वर्षे झाली, आणि मोदी सरकार सत्तेत येऊन ११ वर्षे उलटली तरीही …
Read More »सोयाबीनच्या हमीभावाने खरेदीसोबतच खाद्यतेलावरील आयात शुल्कही वाढवले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मानले केंद्र सरकारचे आभार
सोयाबीनची ९० दिवसांनी हमीभावाने खरेदी करण्याच्या निर्णयापाठोपाठच केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क २० टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला भाव मिळेल, असा विश्वास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला असून या निर्णयाबद्दल त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. राज्यात सोयाबीनचा पेरा ५२ लाख हेक्टर …
Read More »रविकांत तुपकर यांच्याबरोबरील बैठकीत अजित पवार यांनी दिले हे आश्वासन सोयाबीन, कापसासह शेतमालाला योग्य वाढीव हमीभाव देण्यासह केंद्र शासनाची अनुकुल भूमिका
शेतकऱ्यांच्या शेतमालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका असून सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी, तसेच निर्यातीस परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अनुकुलता दर्शविली आहे. ऊसाचा एमएसपी वाढवून देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली असून त्याचे …
Read More »सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पंचनामा करण्याचे शासनाचे आदेश राजुरा तालुक्यात प्रत्यक्ष पाहणीनंतर तातडीने दिले होते स्थानिक यंत्रणेला कार्यवाहीचे निर्देश
अस्मानी सुलतानी संकटात सापडलेल्या, आणि सतत अनिश्चिततेच्या छायेत असणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा सोयाबीन पिकावरील कीड आणि रोगाच्या प्रादुर्भावाने त्रस्त केले; या शेतकऱ्यांच्या मदतीला राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार धावून आले; मुनगंटीवार यांनी या नुकसानग्रस्त शेतकऱ्याची व्यथा प्रत्यक्ष शेतावर भेटू देवून जाणून घेतली: या बाबताची …
Read More »कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी ५२४ कोटींचा आराखडा सादर करा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश
राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर गळितधान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असून या योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या ५२४ कोटींच्या निधीच्या खर्चाचा आराखडा तत्काळ सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. राज्याच्या अर्थसंकल्पात सोयाबीन व कापूस पिकांसाठी सन २०२२-२३ ते …
Read More »कृषीमंत्री धनंजय मुंडे बांधावर! गोगलगायी नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेली औषधे जिल्हा नियोजन समितीतून उपलब्ध करून देण्याच्या सूचना
मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी परळी वैजनाथ तालुक्यासह बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई या भागात तसेच मराठवाड्यातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे सोयाबीन व कापसाच्या पिकाला गोगलगायी नष्ट करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या आधारे आज मी स्वतः परळी तालुक्यातील काही गावांमध्ये पाहणी केली असता गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला असल्याचे वास्तव आहे. …
Read More »
Marathi e-Batmya