Tag Archives: state election commissioner

आयुक्त दिनेश वाघमारे यांची घोषणा, बिनविरोध निवडणूक झालेल्या ठिकाणच्या या गोष्टी तपासणार २९ पैकी अनेक महापालिकांमधील प्रभागांमधील अनेक उमेदवार बिनविरोध पद्धतीत विजयी

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूकीची प्रक्रिया अद्याप सुरु आहे. मतदानाला अवकाश असला तरी मुंबईसह अनेक महापालिकांमधील सत्ताधारी पक्षाचे उमेदवार मतदान होण्याआधीच बिनविरोध म्हणून निवडूण आले आहेत. तसेच या उमेदवारांची संख्या थोडी थोडकी नव्हे तर ६० पेक्षा जास्त उमेदवारांची संख्या आहे. त्यावरून विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठविली असतानाच राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राहुल नार्वेकर यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करा नार्वेकरांच्या नातेवाईकांच्या प्रचारात सक्रिय विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांवर कारवाई करा

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना अर्ज दाखल करताना धमकावल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे. नार्वेकर यांचे वर्तन आक्षेपार्ह व आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे असल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत तसेच त्यांच्या कार्यालयातील तब्बल ७० अधिकारी व कर्मचारी नार्वेकर यांचे नातेवाईक असलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारात सक्रीय भाग घेत आहेत, या …

Read More »

दिनेश वाघमारे यांची माहिती, प्रचार समाप्तीनंतर सर्व प्रसारमाध्यमांतील निवडणूकीच्या जाहिरातींना बंदी १३ जानेवारीला संध्याकाळपासून जाहिरांतीना बंदी

महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार असल्याने, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वरे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली. राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात बैठक …

Read More »

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याकडून महापालिका निवडणूकीची घोषणा राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान व १६ जानेवारीला मतमोजणी

बृहन्मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान; तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसह एकूण २ हजार ८६९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या सर्व महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज येथे …

Read More »

आचारसंहितेसंदर्भातील प्रस्तावांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर पाठवला प्रस्ताव

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कालावधीत आचारसंहितेतून सूट देण्यासाठी प्राप्त प्रस्तावांची छाननी करण्याकरिता लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या वेळी स्थापन करण्यात येणाऱ्या समितीच्या धर्तीवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली १६ ऑक्टोबर २०२५ रोजी आयोगाच्या कार्यालयात …

Read More »

सप्टेंबर २०२४ पासून रिक्त असलेल्या राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त पदी दिनेश वाघमारे राज्य सरकारकडून नोटीफिकेशन जारी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांची जबाबदारी पार पाडणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त पदी युपीएस मदान यांच्या निवृत्तीनंतर रिक्त पदावर आयएएस अधिकारी दिनेश वाघमारे यांची आज नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे सप्टेंबर २०२४ रोजी सनदी अधिकारी युपीएस मदान हे निवृत्त झाल्यानंतर त्या जागेवर राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची नियुक्ती करण्याचा …

Read More »

राज्य निवडणूक आयुक्त पदासाठी नावाची शिफारस करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना राज्य सरकारचा ऐवजी आता मुख्यमंत्री फडणवीस यांना अधिकार

मागील काही वर्षापासून राज्यातील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्याला त्याची सेवा पूर्ण झाली असेल किंवा त्याच्या सेवानिवृत्तीचा काळ जवळ आला असेल अशा आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती राज्य निवडणूक आयुक्त पदी करण्याचा अधिकार यापूर्वी राज्य सरकारला होता. मात्र आता अशा सनदी अधिकाऱ्याचे नाव सुचविण्याचे अर्थात शिफारस करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना …

Read More »

पंतप्रधान मोदींनी मुख्य सचिव सौनिक यांचे नाव घेत राज्य सरकारला लगावली चपराक महाराष्ट्रातील महिला सशक्तीकरण केंद्रालाही लाजवतय

मागील काही वर्षात महाराष्ट्रातील महिला विकास व नारी सशक्तीकरणाबाबत महाराष्ट्र हा देशाला दिशा देण्याचे काम करत असून देशापेक्षा महाराष्ट्राचे काम जास्त चांगले असल्याचे सांगत राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे नाव घेत हा महिला अधिकारी चांगले काम करत असल्याचे वाढवण बंदरानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. राज्याच्या …

Read More »

या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर १५ जानेवारी रोजी होणार मतदान

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. मदान यांनी सांगितले की, एप्रिल …

Read More »