Tag Archives: tourism minister

मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश, पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी करावी यंदा डोंगरी महोत्सव एप्रिल मध्ये

राज्यातील पर्यटनस्थळांची प्रचार प्रसिध्दी होण्यासाठी पर्यटन विभागाने काटेकोरपणे प्रसिद्धीचे नियोजन करावे. राज्यात, देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर राज्यातील पर्यटनस्थळांची प्रसिध्दी प्रभावीपणे करावी. डोंगरी महोत्सवाचे एप्रिल मध्ये आयोजन करावे, असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे पर्यटन विभागाच्या विविध विषयाच्या अनुषंगाने बैठक झाली. त्यावेळी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी …

Read More »

शंभुराज देसाई यांची माहिती, पर्यटन विभागाच्या १४ लोकसेवा अधिसूचित 'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५' नुसार सेवा वेळेत देणे बंधनकारक

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५’ अंतर्गत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पर्यटन संचालनालय, मुंबई आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांच्यामार्फत पात्र व्यक्तींना पुरविण्यात येणाऱ्या एकूण १४ लोकसेवा अधिसूचित केल्या आहेत. या सेवांसाठी नियत कालमर्यादा, पदनिर्देशित अधिकारी, प्रथम आणि द्वितीय अपील प्राधिकारी निश्चित करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन मंत्री …

Read More »

शंभूराज देसाई यांची माहिती, राज्यात नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम राबवणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यटन विभागामार्फत राज्यातील ७५०० युवांना प्रशिक्षण देण्याचा ‘नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम’ व पर्यटकांना सुविधा देणारे ‘नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र’ पाच ठिकाणी उभारण्यात येणार आहे. ‘नमो पर्यटन’ उपक्रम स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देत, जागतिक पर्यटकांना आकर्षित करेल. हा उपक्रम महाराष्ट्रात पर्यटन …

Read More »

शंभूराज देसाई यांची माहिती, शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रमुख महोत्सवाचा दर्जा महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा प्रतिष्ठित दर्जा प्रदान केला असून हा भव्य महोत्सव २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, २०२५ या कालावधीत, घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर येथे साजरा होईल. या महोत्सवा दरम्यान स्थानिक लोककला, गोंधळी गीत, भारुड, जाखडी नृत्य यांसारख्या पारंपरिक कलांचे सादरीकरण होईल. गोंधळ, …

Read More »

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून पर्यटकांनी ऐतिहासिक पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने (IRCTC), ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचा अनुभव देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ या एका विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. ही यात्रा Bharat Gaurav Tourist Train अंतर्गत ०९ जून २०२५ पासून सुरू होत आहे. या ५ दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या …

Read More »

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्या सूचना, पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटन वाढीवर भर द्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करा

पर्यटन विभागाच्या सर्व पर्यटक निवासांच्या ठिकाणी पर्यटन वाढीसाठी कोणकोणत्या बाबी करता येवू शकतील हे विचारात घेवून नियोजन करावे, त्याचबरोबर पर्यटन विभागाच्या मालकीच्या सर्व मालमत्तांची गुणवत्ता तपासणी करणारी पथके नियुक्त करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मंत्रालयात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची बैठक झाली. या बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. …

Read More »

एमटीडीसी’चा ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम ‘स्कोच’ पुरस्काराने सन्मानित

पर्यटन स्थळांचा पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाची दखल घेऊन प्रतिष्ठित स्कोच (SKOCH)च्या रौप्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे हा पुरस्कार सोहळा झाला. ‘एमटीडीसी’च्या अधिकारी मानसी कोठारे यांनी हा पुरस्कार …

Read More »

राज्यात सहा ठिकाणी शिवसृष्टी उभारणार पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांची घोषणा

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची माहिती पुढील पिढ्यांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यामार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, औरंगाबाद, नाशिक व रामटेक येथे सहा ठिकाणी शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय व शिवकालीन थीम पार्क उभारणार आहे. या सर्व कामांसाठी ४१० कोटी रूपयांची तरतुद करण्यात आली असून एक …

Read More »

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मार्फत देखो आपला महाराष्ट्र टुर पॅकेज जाहीर ७५ ठिकाणी फिरण्याची संधी

राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत – विदेशी पर्यटकांना मोठया प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे महाराष्ट्र दिनाचा औचित्य साधून तसेच स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्षांत महाराष्ट्र अंतर्गत ७५ टुर पॅकेज ०१ मे २०२३ रोजी सुरु करण्यात येत आहे. पर्यटन कौशल्य विकास आणि उद्योजकता महिला आणि बाल …

Read More »

३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळा देशातील २२ राज्यांच्या राजधान्यांमध्ये साजरा करणार आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र करणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन …

Read More »