राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले असल्याचा आरोप करत सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. …
Read More »संत्रावर्गीय फळगळतीमुळे झालेल्या नुकसानीस १६५ कोटी ८३ लाखाची मदत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती
वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात ऑगस्ट २०२४ मध्ये ढगाळ वातावरण आणि जुलै ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत अमरावती, अकोला व बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे संत्रा पिकाच्या फळगळतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यास विशेष बाब म्हणून १६५ कोटी ८३ लाख ८ हजाराची मदत देणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन …
Read More »छगन भुजबळ यांची मागणी, तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा
अवकाळी पावसामुळे येवल्यासह नाशिक जिल्ह्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. याबाबत माजीमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्यासह नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना पत्र दिले आहे. माजी मंत्री छगन …
Read More »जानेवारी ते मे २०२४ मधील अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाई वाटपास मंजूरी ५९६ कोटी रुपये वाटप होणार- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
राज्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना ५९६ कोटी २१ लाख रुपये नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे …
Read More »मुंबई ठाण्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसः मोठे होर्डींग कोसळून दुर्घटना
काही दिवसांपूर्वी राज्याच्या विविध भागात उष्णतेच्या अनेक लाटा येणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. त्यापाठोपाठ राज्यातील अनेत भागात उष्णतेच्या लाटानंतर वादळी वाऱ्यानंतर अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला. त्यानुसार मागील दोन-तीन दिवसांपासून सातत्याने अवकाळी पावसाने राज्याच्या विविध भागात हजेरी लावली. त्यानंतर आज संध्याकाळी मुंबई ठाण्यासह आजूबाजूच्या परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने …
Read More »आणखी काही दिवस या जिल्ह्यात राहणार अवकाळी पाऊसाचा मुक्काम…
मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावत आधीच उन्हाच्या तडाक्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा देण्यास सुरुवात केली असल्याने रब्बी हंगामात हाता तोंडाशी आलेले पीक हातचे वाया जाण्याची शक्यता निर्माण होण्याची झाली आहे. त्यातच आज भारतीय हवामान खात्याने इशारा देत आणखी काही दिवस अवकाळी पाऊस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. …
Read More »अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २१०९ कोटींचा निधी वितरणास मान्यता
गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील …
Read More »अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मदत
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत वाटपास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. नोव्हेंबर मध्ये हा अवकाळी पाऊस झाला होता. या पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानातून दिलासा म्हणून बाधित शेतकऱ्यांना आज प्रतिनिधिक स्वरुपात धनादेश देण्यात आले. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, …
Read More »गारपीट, अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करा
राज्यात मागील आठ दिवसांपासून निसर्गाचा कोप झाला आहे. यात मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गारपीट व अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज २८९ अनव्ये सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्याद्वारे केली. अंबादास दानवे म्हणाले की, राज्यातील …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, अवकाळी पाऊस व गारपिटी नुकसानाची पंचनामे…
राज्य शासन भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विदर्भासह राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसामुळे व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून शासनाला अहवाल प्राप्त होताच तातडीने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर माध्यमांशी …
Read More »
Marathi e-Batmya