आणखी काही दिवस या जिल्ह्यात राहणार अवकाळी पाऊसाचा मुक्काम…

मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावत आधीच उन्हाच्या तडाक्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा देण्यास सुरुवात केली असल्याने रब्बी हंगामात हाता तोंडाशी आलेले पीक हातचे वाया जाण्याची शक्यता निर्माण होण्याची झाली आहे. त्यातच आज भारतीय हवामान खात्याने इशारा देत आणखी काही दिवस अवकाळी पाऊस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला.

भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार दक्षिण कोंकण, मध्य महाराष्ट्रातील, विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला. तर मालेगांव मध्ये कमाल तापमान ४२ अंश सेल्सियस तर नागपूरमध्ये किमान तापमान १९ अंश सेल्सियस राहणार असल्याचा अंदाजही यावेळी व्यक्त केला.

दक्षिण महाराष्ट्रातील नाशिक, धुळे,पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, जळगांव, वाशिम, बुलढाणा, अकोला, वर्धा, अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली आदी जिल्ह्यात १२ एप्रिल २०२४ रोजी अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. १३ एप्रिल २०२४ रोजी बीड, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, अमरावती, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा आदी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला.

१४ एप्रिल २०२४ रोजी यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, गोंदिया, भंडारा, गडचिरोली आदी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
१५ एप्रिल २०२४ रोजी उस्मानाबाद, बीड, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, सोलापूर, पुणे, आदी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. तर १६ एप्रिल २०२४ रोजी हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर आदी जिल्ह्यात अवकाळी पाऊसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

About Editor

Check Also

१० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही १ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *