राहुल गांधी यांचा आरोप, लोकसभेतील जागांची संख्या वाढवून सत्तेत टिकून राहणे हा भाजपाचा राजकिय डावपेच डिलीमिटेशन विधेयक महिला आरक्षण विधेयकाच्या नावाखाली पुढे रेटण्याचा प्रयत्न

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केंद्राच्या प्रस्तावित ‘परिसीमन विधेयका’वर (Delimitation Bill) जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की, लोकसभेतील जागांची संख्या वाढवून ८५० करण्यामागचा भाजपचा उद्देश भारताचे राजकीय चित्र बदलणे आणि सत्तेत टिकून राहणे हा एक राजकीय डावपेच आहे.

दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, महिला आरक्षणाचा वापर परिसीमन प्रक्रियेला पुढे रेटण्यासाठी एक निमित्त म्हणून केला जात आहे. राहुल गांधी यांनी असा युक्तिवाद केला की, महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाचे विधेयक संसदेत आधीच मंजूर झाले आहे आणि ते सध्याच्या लोकसभेतील सदस्यसंख्येच्या चौकटीत राहूनही लागू केले जाऊ शकते.

आसाम, बिहार आणि जम्मू-काश्मीरमधील परिसीमन प्रक्रियेचा संदर्भ देत, काँग्रेस नेत्याने आरोप केला की, प्रस्तावित कायद्यामुळे भाजपला आपल्या निवडणूक हितानुसार देशाचा राजकीय नकाशा पुन्हा आखण्याची संधी मिळेल. त्यांनी तरुण मतदारांना, विशेषतः ‘जनरेशन झेड’ (Gen Z) पिढीला, ‘८५०’ हा आकडा लक्षात ठेवण्याचे आवाहन केले आणि याला लोकशाहीसाठी धोका असल्याचे म्हटले.

राहुल गांधी यांनी आरोप केला की, काँग्रेसने निवडणुकीतील कथित फेरफारांचा पर्दाफाश केल्यानंतर, आता भाजप तपासणीपासून वाचण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहे. मतदानातील कथित चोरीबाबत पक्षाने घेतलेल्या मागील पत्रकार परिषदांचा उल्लेख करत त्यांनी दावा केला की, त्यांच्या सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की ८० टक्के भारतीय आणि १०० टक्के ‘जनरेशन झेड’मधील उत्तरदात्यांना असे वाटते की निवडणुकांमध्ये फेरफार (चोरी) केली जात आहे.

राहुल गांधी यांनी भाजपावर टीका करत म्हणाले की, “आता हे ‘तीन मस्कटीअर्स’ (three Musketeers) नवीन कल्पना घेऊन आले आहेत,” असे म्हणत टीका केली. तसेच राहुल गांधी आरोप केला की, काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजप स्वतःला वाचवण्यासाठी पळवाटा शोधत आहे.

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या अहवालातील १४ कोटी मतदार वगळल्याच्या मुद्द्याचाही उल्लेख केला आणि याला निवडणुकीतील अनियमिततेच्या आपल्या आरोपांशी जोडले. गांधींनी दावा केला की, काँग्रेसकडे आठ राज्यांत निवडणुकीत फेरफार झाल्याचे पुरावे आहेत आणि लवकरच पक्ष निवडणूक आयोगाबद्दल मिळालेली माहिती सर्वांसमोर मांडेल.

याव्यतिरिक्त, राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही तीव्र टीका केली आणि त्यांना “सिद्ध गुन्हेगार” (proven criminal) असे संबोधले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार असा आरोप केला आहे की, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यात आणि अनियमिततेच्या तक्रारींचे निराकरण करण्यात निवडणूक आयोग अपयशी ठरला आहे. प्रस्तावित मतदारसंघांच्या पुनर्रचनेला (डिलिमिटेशन) आपल्या पक्षाचा विरोध असल्याचे पुन्हा स्पष्ट करत, राहुल गांधी यांनी असे मत मांडले की, महिला आरक्षणाला लोकसभा मतदारसंघांच्या विस्ताराशी किंवा पुनर्रचनेशी जोडू नये. त्यांनी असा आरोप केला की, जागांची संख्या ८५० पर्यंत वाढवल्यास राजकीय प्रतिनिधित्वाचे स्वरूप पूर्णपणे बदलू शकते आणि त्याचा अनुचित फायदा भाजपला मिळू शकतो.

About Editor

Check Also

डिलीमिटेशन विधेयकः राष्ट्रवादीच्या (शरद पवार) गटाकडून खासदारांना व्हिप जारी खासदारांना कल्पना देण्यात आली असून खासदारांना लोकसभेत हजर राहण्याचे निर्देश

डिलीमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (शरदचंद्र पवार) आपल्या खासदारांना व्हीप जारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *