कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत कोकण विभागाच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यमंत्री योगेश कदम यांच्या संकल्पनेतून कोकणातील सर्व समुद्र किनाऱ्यांचा आंतरराष्ट्रीय दर्ज्याचा विकास करण्यासाठी तसेच सुसज्ज, स्वच्छ आणि अत्याधुनिक पर्यटनाच्या सोयी सुविधा असलेले समुद्र किनारे विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी प्रथम प्राधान्याने दापोली तालुक्यातील …
Read More »गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती, २०२ घुसखोरांना हद्दपार केले विधानसभेत भाजपा आमदार संजय उपाध्याय यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना माहिती
मुंबईसह महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात बांग्लादेशीय घुसखोर आढळणे ही गंभीर बाब आहे. पश्चिम बंगाल मधील एजंटस मार्फत यांना आधारकार्डसह कागदपत्रे मिळतात, त्यापैकी अनेक पात्र सिद्ध होतात. आतापर्यंत २०२ घुसखोरांना हद्दपार केले. अटक केलेल्यांना ठेवण्यासाठी नवीन डिटेन्शन सेंटर निर्माण करण्यात येईल. केंद्र सरकारशी संबंधित कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्याची विनंती केली जाईल असे गृह …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारणार, पहिल्या टप्प्यात १० मॉल पंचवीस लाख 'लखपती दीदी' करण्याचे उद्दिष्ट
‘महालक्ष्मी सरस’ हा अत्यंत लोकप्रिय उपक्रम झाला आहे. राज्यभरातील बचत गटांना हक्काचे विक्रीचा साधन उपलब्ध व्हावे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर दहा जिल्ह्यात दहा मॉल तयार करणार. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात उमेद मॉल तयार करणार आहोत. त्याचं बरोबर राज्यात आगामी कालावधीत एक कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प आहे. सध्या राज्यात १८ लाख लखपती …
Read More »जयकुमार गोरे यांच्या सूचना, जमीन नसलेल्या बेघरांना घरकुलाचा लाभ प्राधान्याने कोकण विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व घरकुल लाभार्थ्यांना आपल्या हक्काचे घर मिळवून देण्याच्या दृष्टीने यंत्रणेने काम करावे, यामध्ये जमीन नसलेल्या बेघरांना घरकुल योजनेंतर्गत प्राधान्याने लाभ देण्याच्या सूचना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या. मंत्रालयात ग्रामविकास व पंचायत राज विभागाशी संबंधित कोकण विभागाची आढावा बैठक झाली. बैठकीस ग्रामविकास व पंचायत …
Read More »एकनाथ शिंदेंनी उध्दव ठाकरेंना इशारा देत कोकण विकासासाठी केल्या या घोषणा मर्यादा सोडण्याची वेळ आणू नका
दोन आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेमधून शिंदे गटावर आणि भाजपावर परखड शब्दांत हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुन्हा खेडमधल्या त्याच गोळीबार मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर सभा घेतली असून या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. …
Read More »रामदास कदम यांचा आरोप, मला आणि माझ्या मुलाला संपविण्याचा कट उध्दव ठाकरे यांच्यावर पुन्हा साधला निशाणा
शिवसेनेतील पक्ष नेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर रामदास कदम यांनी आपण लवकरच उध्दव ठाकरे यांच्याबाबत बोलणार असल्याचे जाहिर केले. त्यानुसार आज एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदम यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधत म्हणाले, मला आणि माझ्या मुलाला संपविण्याचा कट उध्दव ठाकरे यांनी आखल्याचा आरोप करत शिवसेनेतील मराठा नेत्यांना संपविण्याचा …
Read More »रामदास कदम यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, मी आता बोलणार फुटीर गटाच्या नेतेपदीही लगेच वर्णी
जसजशी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी जवळ येत आहे तसतसे बंडखोर गटाच्या एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या राजकिय धक्के देत हादरविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आज शिवसेनेचे नेते रामदास कदम आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर तातडीने एकनाथ शिंदे यांच्या गटाने या दोघांसह माजी …
Read More »
Marathi e-Batmya