मुंबई पोलिसांची १२,८९९ पदे रिक्त

मुंबई शहराची कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीसांची भूमिका महत्त्वाची आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीनुसार आजमितीस अप्पर पोलीस आयुक्त पदापासून शिपाई पदापर्यंत १२ हजार ८९९ पदे ​रिक्त असल्याचे उघड झाले आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पोलिस आयुक्त कार्यालयाकडे अर्ज करत सद्यस्थितीत मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांची माहिती विचारली होती. मुंबई पोलीस आयुक्तलयांचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद कांबळे यांनी अनिल गलगली यांस ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंतची माहिती दिली. यात एकूण मंजूर पदांची संख्या ५१३०८ आहेत. यात ३८४०९ कार्यरत पदे असून १२८९९ पदे रिक्त आहेत.

सर्वाधिक रिक्त पदे पोलिस शिपाईची

पोलिस शिपाईची २८९३८ पदे मंजूर आहेत. यापैकी १७८२३ कार्यरत पदे असून ११११५ पदे रिक्त आहेत. यानंतर पोलीस उप निरीक्षकांची ३५४३ पदे मंजूर असताना फक्त २३१८ कार्यरत पदे असून १२२५ पदे रिक्त आहेत. पोलीस निरीक्षक ही १०९० मंजूर पदे असून यापैकी ३१३ पदे रिक्त असून सद्या ९७७ कार्यरत पदे आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांची १४१ पैकी २९ पदे रिक्त आहेत. पोलीस उपायुक्त यांची ४३ पदे मंजूर असून ३९ पदे कार्यरत आहेत. यात ४ पदे रिक्त आहेत. तर अप्पर पोलीस आयुक्त यांचे १२ पैकी फक्त १ पदे रिक्त आहेत.

अनिल गलगली यांच्या मते मंजूर पदे ही पूर्वीपासून असून यात काही बदल झाला नाही पण प्रत्येक वर्षी सेवानिवृत्ती मुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. यात काळानुसार बदल करत रिक्त पदे भरताना मंजुर पदांची संख्या वाढविली तर मुंबई पोलिसांवर येत असलेला ताण कमी होईल, असे गलगली यांनी नमूद केले आहे.

About Editor

Check Also

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुक मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर राज्य निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या एक दिवस आधी माहिती

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *