Breaking News

मुंबई जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीची बैठक संपली, पण निर्णय… विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपांच्या चर्चेला वेग

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जागा वाटपाच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज पुन्हा एक बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील विविध जागांवर शिवसेना उबाठा गटाबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार गटाकडून दावा करण्यात आला. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाची कोंडी आज तरी निदान फुटू शकली नाही.

महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत. इतर विभागांपेक्षा मुंबईत सर्वाधिक जागा असून जवळपास ३६ विधानसभेच्या जागा आहेत. यातील सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पक्षाला उर्वरित महाराष्ट्रात अधिकच्या जागा जिंकण्यासाठी फारशी ताकद लावण्याची गरज पडत नाही. त्यातच आतापर्यंत शिवसेनेचे राजकारण हे मुंबईला मध्यभागी ठेवून झाले आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाचा आग्रह मुंबईतील ३६ जागांपैकी २० ते २२ जागा एकट्या सेनेला मिळाव्या यासाठी आहे. उर्वरित १६ जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने लढवाव्या असे मत शिवसेना उबाठाकडून प्रयत्न आहे.

मात्र मागील काही दिवसांपासून राहुल गांधी यांच्या झंझावाती दौऱ्यामुळे लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या यशामुळे काँग्रेसमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. तसेच काँग्रेसच्या बाजून जनतेत अनुकूल परिस्थितीही आहे. त्यामुळे काँग्रेसकडून मुंबईत कमी जागांवर निवडणूक लढविण्याबाबत फारशी उत्सुक नाही. त्यामुळे मुंबईतील विधानसभेच्या अधिकच्या जागांवरही काँग्रेसकडून दावा करण्यात येत आहे.

तसेच आतापर्यंत राष्ट्रवादीचे खाते मुंबईत उघडले नव्हते, मात्र गत निवडणूकीत राष्ट्रवादीला काही किमान जागा मिळाल्या होत्या. मात्र आता त्या निवडूण आलेल्या जागा अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे पवार गटाकडे सध्या कोणीच नाही. परंतु लोकसभा निवडणूकीतील अनुभव पाहता मुंबईत जागा लढविण्यासाठी आता शरद पवार गटानेही पुढाकार घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, २०१९ मध्ये महाविकास आघाडीने जिंकलेल्या १६ जागां व्यतीरिक्त इतर जागांवर महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी दावा केला आहे. त्यामुळे जागा वाटपातील चर्चा गुंतागुतीची झाली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत आज मुंबईतील जागा वाटपाबाबत चर्चा झाली तरी त्याबाबतचा निर्णय अद्याप अंतिम झाला नाही.

Check Also

अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या विविध योजनांसाठी १५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करा १५ ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत सुविधा कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, शैक्षणिक कर्ज योजना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *