Breaking News

मोहन भागवत यांचे वादग्रस्त विधान, शिवरायांची समाधी टिळकांनी शोधली वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता

मालवण येथील राजकोट किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर आणि स्थानिक भाजपा आमदार खासदारांवर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्या. या घटनेमुळे महायुती सरकार धास्तावले असतानाच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प्रमुख मोहन भागवत यांनी शिवरायांच्या समाधीवरुन केलेल्या विधानामुळे आता पुन्हा एकदा वादंग निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा भाजपा प्रणित महायुती सरकार आणि भाजपा बॅकफूटवर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी छ्त्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देताना म्हणाले की, इंग्रजां विरुद्ध लढणारे शिवाजी महाराज इथेच होऊन गेले. इथे सुद्धा त्यांचं स्मरण व्हावं म्हणून जागरण केलं. रायगडावर उत्सव सुरु केला. टिळकांनीच रायगडावरील छत्रपती शिवरायांची समाधी ते सर्व शोधून काढलं अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले. तसेच रवींद्रनाथ टागोर यांनी शिवाजी महाराजांवर कविता लिहिली अशा प्रकारेचे भ्रम निर्माण करणारे वक्तव्य करत विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर वादंग निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

राज्य सरकारने काही वर्षांपुर्वी प्रकाशित केलेल्या महात्मा फुले यांच्या समग्र चरित्र खंडात रायगडावरील शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढल्याचा आणि शिवाजी महाराजांवर पहिला पोवडा लिहिल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर लोकमान्य टिळक यांनी शिवाजी महाराजांबद्दल उल्लेख केल्याची नोंद राज्य सरकारच्या पुस्तकात आहे. या गोष्टी सरकारकडे नोंदणीकृत असलेल्या पुस्तकात माहिती असताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शिवाजी महारांची समाधी शोधण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना देत पुन्हा एकदा इतिहासाची मोडतोड राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून सुरु असल्याची चर्चा इतिहास प्रेमी आणि शिवप्रेमींमध्ये सुरु झाली आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावा राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र मोहन भागवत यांचे वक्तव्य खोडून काढत, छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनीच शोधून काढली. त्यांनीच शिवजयंती साजरी केली. तसेच शिवाजी महाराज यांच्यावर त्यांनीच पहिला पोवाडा लिहिल्याचे सांगत मोहन भागवत यांचा दावा कोढून काढला.

तर काँग्रेस नेते तथा विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मोहन भागवत यांच्या त्या वक्तव्यावर टीका करताना म्हणाले की, मोहन भागवत यांची भूमिका दिशाभूल करणारी आहे. शिवाजी महाराज यांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी शोधली. याचे इतिहासात पुरावे आहेत. संघाचे लोक काहीपण शोध लावेल. त्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही म्हणतात की सूरत शिवाजी महाराजांनी लुटली नाही. इतिहासा संदर्भात आता भाजपा नेते काहीही बोलत असल्याची टीका केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत