वांद्रे पूर्वचे आमदार आणि माजी आमदार बाबा सिद्धीकी हे त्यांच्या मुलाच्या कार्यालयातून पडल्यानंतर त्यांच्यावर तीन-ते चार आरोपींनी दुचाकीवर येत गोळीबार केला. या गोळीबारातच बाबा सिद्धीकी यांचा मृत्यू झाला. गोळीबाराच्या घटनेनंतर बाबा सिद्धीकी यांना लीलावती रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले. या घटनेवरून महाविकास आघाडीतील विरोधकांनी महायुती सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाबा सिद्धीकी यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बाबा सिद्धीकी यांच्या मृत्यूची बातमी वेतनादायक आणि धक्कादायक असल्याचे सांगत बाबा सिद्धीकी यांची आणि माझी चांगली मैत्री होती. त्यांच्यावर करण्यात आलेल्या गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. काही धागेदोरे मिळाले आहेत. त्यातले काही अँगल्स आम्ही तपासत आहोत. तसेच यासंदर्भातील माहिती पोलिस प्रसारमाध्यमाना देतीलही असे सांगितले.
बाबा सिद्धीकी यांच्यावरील गोळीबारावरून महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली त्याबाबतही यावेळी भाष्य केले.
यावेळी शरद पवार यांच्या मागणीवरून देवेंद्र फडणवीस यांनी टीका करताना म्हणाले की, इतक्या मोठ्या घटनेनंतरही त्यांना केवळ सत्ताच दिसते पाहिजे आहे, त्यांना खुर्ची हवी आहे, आमच्या नजरेसमोर महाराष्ट्र आहे, आम्हाला महाराष्ट्राकडे पाह्यच आहे, महाराष्ट्राची प्रगती, विकास साधायची असून महाराष्ट्राला सुरक्षितही ठेवायचं आहे. त्यामुळे त्यांना खुर्चीकडे पहायचं असेल तर त्यांनी ते पहाव आणि बोलायचं असेल तर बोलावं असे सांगत राजीनाम्याच्या मागणीला धुडकावून लावलं. तसेच बाबा सिद्धीकी यांच्या घराची गुन्हेगारांनी रेकी केल्याचं सांगण्यात येत असल्याबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, त्याबाबतची अधिकृत माहिती नाही. पण काही अँगल्स लक्षात येत आहेत. मूळ चौकशीवर परिणाम होणार नाही अशी माहिती पोलिस माध्यमांना देतील असेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya