साधारणतः ११ वाजल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे नांदगांव मधील उमेदवार सुहास कांदे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीस उभे टाकलेले समीर भुजबळ यांच्यात आज चांगलीच वादावादी झाली. मतदारांच्या एका गटाला आणण्यावरून दोघांत वादावादीत सुहास कांदे यांनी पंकज भुजबळ यांना तुझा मर्डर फिक्स असल्याची धमकी दिली.
झाले असे की, छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी नांदगांव येथून उमेदवारी देण्याची मागणी अजित पवार यांच्याकडे केली. मात्र ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला गेल्याने आणि तेथे विद्यमान आमदार सुहास कांदे यांना पुन्हा उमेदवारी जाहिर करण्यात आल्याने या जागेवरून समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर समीर भुजबळ यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाचे राजीनामे देत अपक्ष उमेदवार म्हणून नांदगांव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे यांच्यातील संघर्ष वाढला. त्यातच आज मतदानाचा दिवस असल्याने उमेदवार सुहास कांदे हे मतदारांच्या एका गटाला बसमध्ये बसवून मतदान केंद्राकडे निघाले होते. त्यावेळी नेमके अपक्ष उमेदवार समीर भुजबळ हे त्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी समीर भुजबळ यांनी सुहास कांदे यांनी आणलेल्या मतदारांना आणि बसला आक्षेप घेतला. त्याचवेळी सुहास कांदे यांचे समर्थकही त्यावेळी तेथे जमले. त्यावेळी हजर असलेल्या पोलिसांनी समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुहास कांदे यांनी समीर भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांकडे पहात तुझा मर्डर फिक्स अशी धमकी दिली.
त्यानंतरही समीर भुजबळ आणि त्यांच्या समर्थकांनी शांत राहणेच पसंत केले. मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तैणात असलेल्या पोलिसांमुळे पुढील अनर्थ टळला.
काही कालावधीनंतर समीर भुजबळ यांना दिलेल्या धमकीबाबत सुहास कांदे यांना विचारले असता ते म्हणाले की, मी कोणालाही नाव घेऊन धमकी दिली नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराला धमकी देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचा खुलासा केला.
Marathi e-Batmya