नीलम गोऱ्हे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप, मात्र संजय राऊत यांच्या प्रत्युत्तरावर सावध दिल्लीतील साहित्य संमेलनात आम्ही कसे घडलो कार्यक्रमात बोलताना गोऱ्हे यांचा आरोप

९८ व्या अखिल भारतीय साहित्य समंलेनाच्या निमित्ताने दिल्लीत सध्या राज्यातील साहित्यिक, प्रेक्षक-वाचक यांच्याबरोबरच राजकिय नेत्यांची वर्दळही सुरु आहे. आज साहित्य संमेलनस्थळी मी कसा घडलो या कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना बोलविण्यात आले. यावेळी नीलम गोऱ्हे यांच्या मुलाखत वजा कार्यक्रम पार पडली. यावेळी नीलम गोऱ्हे यांनी बोलताना शिवसेना उबाठा पक्षात चार मर्सिडीज दिल्या की एक पद मिळत होते असा गंभीर आरोप शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केला. मात्र संजय राऊत यांनी दिलेल्या प्रत्युत्तराने नीलम गोऱ्हे या बचावात्मक पावित्र्यात गेल्याचे दिसून आले.

पुढे बोलताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचे कारण नाही. २०१२ पासून वैगेरे मी पहात आले की शिवाजी पार्क येथे होणारे मेळावे, सभांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्त्ये गर्दी करत होते. दुसरा भाग असा की, संपर्क नको असेल तर तिथे आपण राहण्यात अर्थ नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे जो पर्यंत होते, तोपर्यंत त्यांच सगळीकडे लक्ष होतं नंतर अवनती होत गेली. त्यानंतर आम्हाला भेटीच मिळणार नाहीत हे माहित नव्हतं असेही यावेळी सांगितले.

नीलम नीलम गोऱ्हे पुढे म्हणाल्या की, २०१९ साली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा धन्यता वाटली, कारण बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला हे पद मिळालं याचा आम्हाला आनंद होता. पण आमदारांना भेटी मिळणार नव्हत्या, कुठल्याही विषयासाठी भेट मिळणार नाही, दोन-दोन-तीनदा आरपीसीआर केला तरीही भेट मिळणार नाही. यानंतर स्थित्यंतरं होतात ते काही मुदपाक खाण्याच्या विश्लेषणातून होत नाहीत अशी उपरोधिक वक्तव्यही केले.

त्यावर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर टीका करताना म्हणाले की, ही नीलम गोऱ्हे यांची नमकहरामी आहे. मी ग्रामीण भागातील सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. आज मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मला उलट पक्षाने कधीही पैसे मागितले नसल्याचेही एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.

तर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्यावर खोचक प्रतिक्रिया व्यक्त करत म्हणाले की, आतापर्यंत उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांना चार वेळा आमदार केलं. त्यांनी ज्या काही मर्सिडीज दिल्या असतील त्यांच्या पावत्या वगैरे असतील त्या घेऊन या असे सांगत नीलम गोऱ्हे यांच्यावरच उलट शरसंधाण साधले.

About Editor

Check Also

एसटी बसस्थानक स्वच्छतेसाठी दर १५ दिवसांनी विशेष मोहीम प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाचा पुढाकार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व एसटी बसस्थानकांवर, बसस्थानक परिसरात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये दर १५ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *