मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आरोग्य सेवेतील ६८० जणांना नियुक्ती पत्राचे वाटप शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत तसेच आयुर्वेद महाविद्यालयातील गट ड संवार्गातील निवड झालेल्यांना नियुक्ती पत्रे

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दंत तसेच आयुर्वेद महाविद्यालयासह संलग्न नऊ रुग्णालयातील गट ड संवर्गातील ६८० पदांची सरळसेवेने भरती करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले. नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्यात. रुग्णालयातील रुग्णांना उत्तम सेवा देण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात गट – ड संवर्गातील मंजूर पदापैकी बऱ्याच वर्षापासून ६८० पदे रिक्त होती. रिक्त असलेल्या पदावर सरळसेवा भरतीची प्रक्रिया तात्काळ सुरु करण्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीतर्फे पदभरतीची एकत्र प्रक्रिया राबविण्यात आली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना या समितीचे सदस्य सचिव म्हणून नेमण्यात आले होते.

रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवड झालेल्या १३ उमेदवारांना प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्तीचे आदेश देण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये उपस्थित होते.

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेयो, दंत, आयुर्वेद महाविद्यालय व सलग्नित रुग्णालयातील गट ड सवर्गातील सरळसेवेचे रिक्त पदे भरण्याकरिता मागणीपत्र सामाजिक व समांतर आरक्षणासह मागविण्यात आले होते. जिल्ह्यातील नऊ संस्थांकडून ६८० रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. यामध्ये ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अर्जामधून ६८० उमेदवारांची निवड करण्यात आली. यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ६६ पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये ३४४ पदे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अतिविशेषोउपचार रुग्णालयासाठी १९ पदे, ग्रामीण आरोग्य केंद्र सावनेर ११ पदे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ५७ पदे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १३५ पदे, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयासाठी २२ पदे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय ३ पदे तर शासकीय आयुर्वेद रुग्णालयासाठी २३ पदांचा समावेश आहे.

रुग्णसेवेला बळकटी

जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व विविध सलग्नित रुग्णालयात एकत्र ६८० रिक्त पदांची भरती होत असल्यामुळे रुग्णसेवेला बळकटी मिळणार आहे. रुग्णसेवेसाठी गट ड मधील भरती अत्यंत आवश्यक होती. अशी प्रतिक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व निवड समितीचे सदस्य सचिव डॉ.राज गजभिये यांनी यावेळी दिली.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची माहिती, मुंबईत मराठीसाठी लवकरच स्वतंत्र चित्रनाट्यगृह उभारणार १६४ मराठी चित्रपटांना २४ कोटी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य

दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *