उद्धव ठाकरे यांचा विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांना सवाल, पण मोदींची शाळा कोणती ? राज ठाकरे यांच्या सर्वांच्या शाळेच्या यादीवरून भाषणात दाद

हिंदी भाषेच्या सक्तीवरून मराठी जणांच्या लढ्यासमोर राज्य सरकारने माघार घेतली. त्या अनुषंगाने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे आणि शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती. तसेच अनेक मराठी बांधवही उपस्थित होते. या विजयी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी शिक्षणाचा आणि भाषेच्या कडवटपणा यासंदर्भात बोलताना अनेक नेत्यांच्या मुलांच्या आणि त्या नेत्यांच्या शाळांचे मुद्दा उपस्थित केला. तसेच ते ज्या शाळेत ज्या माध्यमातून शिकले त्या माध्यमाचा आणि भाषेच्या कवडपणाचा संबध काय असा सवालही यावेळी केला.

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी श्रीकांत प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे या दोघांचेही शिक्षण इंग्रजी भाषेत झाल्याचे आवर्जून सांगितले. तरीही प्रबोधन कार ठाकरे यांनी धर्मातील चूकीच्या अनिष्ट प्रथांवर बोट ठेवले. तर बाळासाहेब हे इंग्रजीत शिक्षण घेऊनही इंग्रजी भाषेतील वर्तमान पत्रासाठी व्यंगचित्र काढायचे आणि नंतर मराठीच्या मुद्यावरून आग्रही भूमिका आणि कडवटपणा दाखवल्याचा किस्साही सांगत युती सरकारचा पहिला मुख्यमंत्री मराठी कसा झाला याचा किस्साही यावेळी सांगितला.

हाच धागा पकडत शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक या विजयी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांना सवाल केला.

उद्धव ठाकरे पुढे बोलताना राजने त्याच्या भाषणात अनेकांच्या शाळा काढल्या, अनेकांचे शिक्षण कोणत्या शाळेतून झाले ते ही सांगितले, पण मला एक प्रश्न पडलाय की, मोदींची शाळा कोणती? ते तर सर्वज्ञानी आणि विद्वान आहेत असा उपरोधिक टोला भाजपा वाल्यांना लागवात की ते शाळेत गेलेच नाहीत असा खोचक सवालही यावेळी केला.

उद्धव ठाकरे यांच्या या प्रश्नावर मात्र उपस्थित जनसमुदायातून चायवाला चायवाला अशी उपरोधिक घोषणा द्यायला सुरुवात झाली. मात्र उद्धव ठाकरे यांनी त्याच मुद्यावर न थांबता पुढे म्हणाले की, नुसती भाषा म्हणजे काय असतं आणि त्यासोबत काय काय येतं हे त्यांना कधी कळणार नाही. त्यामुळेच आमचा हिंदी भाषेला विरोध नाही. पण त्याची सक्ती कराल तर आम्ही शक्ती दाखवू असा इशाराही यावेळी दिला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चालणे हाच विकासाचा खरा मार्ग किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव साजरा

छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श जगासमोर ठेवण्यासाठी २०३० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *