सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना (DGP) एका आठवड्यात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे महाराष्ट्र सरकारने यापूर्वी नियुक्त केलेली चौकशी समिती बरखास्त केली जाणार आहे.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार, कोठडीतील मृत्यूशी संबंधित सर्व कागदपत्रे नव्याने स्थापन होणाऱ्या विशेष तपास पथकाकडे सोपवली जातील. तसेच, जर याचिकाकर्त्या विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांना एसआयटी SIT सदस्यांबाबत काही आक्षेप असतील, तर त्या न्यायालयात तो नोंदवू शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर या खटल्याची सुनावणी झाली. यावेळी विजयाबाई सूर्यवंशी यांच्यावतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. न्यायालयाने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत एसआयटी SIT चौकशीचे आदेश दिले असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अॅड प्रकाश आंबेडकर यांचे निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध लढाईसाठी काँग्रेसला पत्र!
४ दिवसांनंतरही उत्तर नाही!
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना १० ऑगस्ट रोजी पत्र लिहून निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध एकत्रित लढाईत पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. मात्र पत्राच्या ४ दिवसांनंतरही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स वर पोस्ट केले की, त्यांनी १० ऑगस्ट २०२५ रोजी दोन्ही नेत्यांना निवडणूक घोटाळ्यांविरुद्ध एकत्र येण्याचे आमंत्रण देणारे पत्र लिहिले होते. आज १४ ऑगस्ट आहे, परंतु अद्यापपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
त्यांनी सांगितले की, यापूर्वी १६ जानेवारी २०२५ रोजी त्यांनी २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील घोटाळ्यांविरुद्ध सहकार्यासाठी खर्गे यांना पत्र लिहिले होते, परंतु काँग्रेसने या लढाईत उच्च न्यायालयात वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला नाही.
अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जर राहुल गांधी, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या या कायदेशीर लढाईत सहभागी झाले असते, तर निवडणूक आयोगाचे “गुप्त” आधीच उघड झाले असते आणि भविष्यात हेराफेरीची शक्यता कमी झाली असती. सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाविरुद्ध लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या प्रकरणात राहुल गांधी अजूनही हस्तक्षेप करू शकतात, असेही सुचवले.
अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमच्यात कोणताही अहंकार नाही, कारण देशाची लोकशाही, संविधान आणि देश धोक्यात आहे.
Marathi e-Batmya