दत्तात्रय भरणे यांची माहिती, अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे २३.१४ लाख एकर शेती बाधित मंत्रिमंडळ बैठकीत नुकसान भरपाई संदर्भात निर्णय होण्याची शक्यता

अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीचे मोठ्या नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार आतापर्यंत २३ लाख १४ हजार ०५७.५ एकर खरीप पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. यासंदर्भात उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नुकसान भरपाईवर राज्य सरकार बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी काही तरी ठोस निर्णय घेणार असल्याचे समजते.

राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, १५ ऑगस्ट २०२५ ते २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत राज्यात सर्वाधिक पाऊस पडला असून २४ जिल्ह्यातील १४८ तालुके हे बाधित झाल्याची माहिती सांगत सर्वाधिक नांदेड जिल्ह्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले.

पुढे बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, एकूण २४ जिल्ह्यात शेतीचे नुकसान झालेली आकडेवारी कृषी खात्याने उपलब्ध करून दिली.  नांदेड – ७१३,८५७.५ एकर शेती बाधित झाली असून त्या खालोखाल वाशिम जिल्ह्याचा समावेश होत आहे.वाशिम जिल्ह्यातील ४११,३९२.५ एकर शेती बाधित झालेली आहे.

सांगली – १२,४३०, कोल्हापूर – २३,४४७.५, सातारा – ८५, सोलापूर – १०३,६८०  नाशिक – १०,४८७.५, यवतमाळ – २९५,८९७.५, बुलढाणा – २२४,४४५,  अकोला – १०९,२५७.५,  हिंगोली –  १००,०००, अमरावती – ८३,३२२.५, बीड – ७२,८४०, धाराशिव – ७१,२५०,  परभणी – ५०,५६२.५, जळगाव – ३६,७९५,  जालना – १२,९४५, छ.संभाजीनगर – ५,१८५, वर्धा – १,९४०, चंद्रपूर – ७.०६२.५, रत्नागिरी – २५२.५, धुळे – ५७.५, लातूर – २५ अहिल्यानगर – ७.५

सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी, हळद, आणि भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

About Editor

Check Also

महिला शेतकऱ्यांसाठी २३ जानेवारी रोजी मुंबईत चर्चासत्राचे आयोजन कृषी विभाग आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतक-यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *