मूग, उडिदच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांनो केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करा पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आ‌वाहन

मुंबई : प्रतिनिधी

हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमी भावाने मूग व उडीद खरेदीसाठीची नोंदणी उद्या १५ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, असे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

केंद्र शासनाने प्रती क्विंटलप्रमाणे उडीदासाठी हमी भाव ६ हजार, मूग हमी भाव ७ हजार १९६ असा जाहीर केला आहे. चालू हंगामात मूग, उडीदाची आवक बाजारात सुरु झाली आहे. बाजारभाव हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी खरेदी केंद्र लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. खरेदी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी उद्यापासून नोंदणी प्रक्रिया सुरु होत असल्याचे त्यांनी सांगितले.

नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांना नोंदणीच्या क्रमवारीनुसार उडीद, मूग खरेदी केंद्रावर आणण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात येईल. ज्या केंद्रावर नोंदणी केली आहे, त्याच केंद्रावर एसएमएस आल्यानंतरच शेतकऱ्यांनी शेतमाल घेऊन यावा. सर्व खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. शेतकऱ्यांनी आपआपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंदणी करावी. नोंदणीकरिता आधारकार्डाची छायाकिंत प्रत आणि पिकाची नोंद असलेला सातबारा उतारा सादर करावा. तसेच शेतकऱ्यांनी मोबाईल नंबर खरेदी केंद्रावर नोंदवावा असे आवाहनही त्यांनी केले.

केंद्र शासनाकडे हमीभावाने मूग, उडीद खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव ३१ ऑगस्ट २०२० ला पाठविण्यात आला आहे. लवकरच मान्यता अपेक्षित आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

बाजारपेठेची स्‍थिरता कृषी विकासाची किल्ली संस्थात्मक वित्तीय संरचनेद्वारे एआय फॉर अॅग्रीला गती देणारे ‘ट्रस्ट इंजिन’ या परिसंवादात तज्ज्ञांचे मत

कृषी क्षेत्रात शासनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यासोबतच बाजारपेठ मजबूत राहणेही गरजेचे आहे. उत्पादनाचे प्रमाण, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *