शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या राष्ट्रीय आणि जिल्हा सहकारी बँकांवर कारवाईचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी

ऐन खरीप हंगामाच्या काळात पीक पेरणीसाठी लागणाऱ्या खर्चासाठी शेतकऱ्यांकडून बँकाकडे कर्जाची मागणी करण्यात येत आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँका आणि सहा जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकांकडून कर्ज देण्यास नकार दिला जात असल्याच्या तक्रारी येत असून कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याबाबत केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल आणि राज्याच्या सहकार मंत्र्याबाबत चर्चा करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या डोक्यावर असलेले कर्ज माफ केले आहे. या कर्जमाफीची रक्कम त्या त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून ती थकबाकी बँकांकडे वर्ग करण्यात आली आहेत. तरीही शेतकऱ्यांना कर्ज देण्यास अनेक राष्ट्रीय बँका नकार देत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांवर कारवाई करण्याबाबत केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून सर्व बँकाना तसे आदेशही लवकरच देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर राज्यातील सहा जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकांकडूनही अनेक शेतकऱ्यांना कर्ज देण्याबाबत नकार देत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याही सहकारी बँकांवर कारवाई करण्याबाबत सहकार विभाग आणि मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

७.५ एचपी वीज वापर आणल्यास शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही केवळ ७.५ हॉर्सपॉवरपर्यंत वीज वापर करणाऱ्यांसाठी लागू आहे. शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *