दूधदरवाढीच्या आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेणार विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूरः प्रतिनिधी

राज्यातील दूधाला चांगला दर मिळावा आणि प्रतिलिटर दूधापोटी ५ रूपयांचे अनुदान शेतकऱ्याला मिळावे यासाठी सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून या हिंसाचारात खरोखरच शेतकरी सहभागी असतील तर त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले.

दुपारच्या सत्रात लक्षवेधी सूचना झाल्यानंतर औचित्याच्या मुद्याद्वारे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनाबाबतचा मुद्दा उपस्थित केला. तसेच या आंदोलना दरम्यान ठिकठिकाणी टँकर पेटविणे, वाहन पेटवून देणे सारख्या घटना घडत आहेत. त्यामुळे हे शेतकऱ्यांचे आंदोलन असल्याने याप्रकरणी शेतकऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आंदोलनाला आमचा विरोध नाही. मात्र काही जणांकडून अख्खे टँकरच्या टँकर पेटवून देण्यात येत आहेत. तसेच अशी कृत्ये शेतकरी कधीच करत नाही. मात्र या आंदोलनाच्या आडून जे कोणी शेतकरी नसलेले आहेत, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. मात्र जे खरोखर शेतकरी आहेत त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात येतील.

About Rajesh Salgaonkar

Check Also

महिला शेतकऱ्यांसाठी २३ जानेवारी रोजी मुंबईत चर्चासत्राचे आयोजन कृषी विभाग आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम

महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने आणि एमएस स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतक-यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *