भारतीय जनता पक्ष स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणते पण ते वस्तुस्थिती तशी नाही. भाजपात गुंड, मवाली, माफिया यांना आमदार, खासदार, मंत्री केले जाते, आता तर भाजपा बलात्काऱ्यांनाही पक्षात संधी देत आहे. बदलापूरमध्ये लहान मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला भाजपाने स्विकृत नगरसेवक करून विकृतीचा कळस गाठला आहे, असा घणाघाती हल्लाबोल करत …
Read More »‘आयपीपीएआय’च्या राष्ट्रीय परिषदेत महावितरणचा सहा पुरस्कारांनी गौरव २६ व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अॅण्ड पॉलिसीमेकर्स परिषदेत पुरस्काराचे वितरण
इंडिपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या (IPPAI) २६ व्या राष्ट्रीय रेग्युलेटर्स अॅण्ड पॉलिसी मेकर्स परिषदेत महावितरणला ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य ‘आयपीपीएआय पॉवर अवॉर्ड्स-२०२६’ मध्ये विविध सहा पुरस्कारांनी शनिवारी गौरविण्यात आले. यात विशेषतः स्मार्ट ग्रिड, रूफटॉप सोलर, बॅटरी स्टोरेज आणि विद्युत वाहन प्रोत्साहन या वर्गवारीमध्ये महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले. ‘महावितरणने तंत्रज्ञान …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, भाजपा आता बलात्काऱ्यांना पाठीशी घालणारा पक्ष बनतोय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी गांभीर्याने घ्यावा
राज्यात महिलांची सुरक्षितता ही गंभीर चिंतेची बाब बनली असून, सत्ताधाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. नाशिक महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आपल्या भाषणात प्रकाश आंबेडकर यांनी महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत तीव्र …
Read More »पुणे महानगरपालिकेकरिता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध पुण्यात पाणी, वाहतूक आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडवू; इच्छाशक्ती असेल तर बदल शक्य
पुण्याच्या प्रश्नांची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि त्यावर उपाय काढण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडले आहे. पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा संयुक्त जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला त्यावेळी पुण्यात …
Read More »मुंबईत १५-१६ जानेवारी २०२६ रोजी पहिल्यांदाच भव्य ब्रोकोली परिषद सुपरफूड म्हणून ओळखल्या जाणारे ब्रोकोली ते आरोग्य
आरोग्य, पोषण आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, ‘सुपरफूड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रोकोलीसाठी समर्पित पहिल्यांदाच भव्य परिषद मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे. “ब्रोकोली लागवडीपासून ते तुमच्या आरोग्यापर्यंत” या थीमवर ही परिषद १५ जानेवारी २०२६ रोजी मुंबईत होईल, त्यानंतर १६ जानेवारी २०२६ रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील …
Read More »काँग्रेसची तक्रार, निवडणूक आयोगाची दखल, मुख्यमंत्री फडणवीस यांना नोटीस मुख्यमंत्री फडणवीसांच्या आचारसंहिता भंगाबाबत काँग्रेसच्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २ जानेवारी २०२६ रोजी मुंबई मेट्रो रेल्वेमध्ये एका खाजगी चॅनेल व त्यांच्या टीमला दिलेल्या मुलाखतीद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबाबत काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी ही माहिती दिली. या संदर्भात, ९ जानेवारी २०२६ …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, वांद्र्यातील एमएसआरडीसीची २४ एकर जमीन अदानीच्या घशात तर MSRDC चे ऑफिस दादरला २ कोटी रुपये भाड्याच्या जागेत
देवेंद्र फडणवीस सरकार दिल्लीच्या आदेशाने मुंबईतील मौल्यवान व अत्यंत महत्वाच्या जमिनी लाडक्या उद्योगपतीच्या घशात घालत आहे. विमानतळ, धारावी, देवनार डंपिंग ग्राऊंड, मोतीलाल नगर, एअर इंडिया वसाहत, मदर डेअरीची जमीन व मिठागरांची जमीन दिल्यानंतर आता वांद्रे रिक्लमेशन येथील एमएसआरडीसीच्या कार्यालयाची २४ एकर जमीनही अदानीला बेकायदेशीरपणे दिली आहे. अदानीला आतापर्यंत मुंबईतील ३ …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, भाजपा व राष्ट्रवादी सत्तेत राहुन एकमेकावर आरोप कसले करतात? सांस्कृतिक शहर, विद्यचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता ड्रग्ज; गुंडगिरी व कोयता गँगचे माहेरघर
राज्यात भाजपा, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ट्रिपल इंजिन सरकार आहे. तिन्ही पक्ष फक्त सत्तेची मलई खाण्यासाठी एकत्र आहेत. सत्तेत राहून अजित पवार भाजपावर व भाजपा अजित पवारांवर जाहीर व गंभीर आरोप करत आहेत. या दोन्ही पक्षांना आरोपच करायचे असतील तर सत्तेला चिकटून कशाला बसता, सत्तेतून बाहेर …
Read More »प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, बदल्या-पदोन्नती करताना एसएचआरसीच्या मूल्यांकनानुसार कार्यवाही करा आरोग्य विभागांतर्गत अधिकाऱ्यांच्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश
सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची बदली, पदोन्नती करताना ‘राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र’ (एसएचआरसी) च्या प्रणालीनुसार कामगिरीवर आधारित मूल्यांकन अहवालानुसार पारदर्शकपणे करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. प्रकाश आबिटकर पुढे म्हणाले की, केंद्र शासनाची ‘राष्ट्रीय आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (एनएचएसआरसी) नवी दिल्ली’ ही …
Read More »ईडीची मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव तपासात अडथळा आणल्याचा आरोप करत दाखल केली याचिका
सक्तवसुली अंमलबजावणी संचालनालयाने अर्थाने ईडी सर्वोच्च न्यायालयात कलम ३२ नुसार याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये पश्चिम बंगाल सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आय-पीएसी कोळसा घोटाळा प्रकरणातील त्यांच्या तपासात अडथळा आणल्याचा आरोप केला आहे. केंद्रीय एजन्सी ईडीने त्यांच्या याचिकेत या घटनेची केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी करत, असा …
Read More »
Marathi e-Batmya