Editor

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक प्रशिक्षणाचे नियोजन प्राधान्याने करा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे आदेश

सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबतचा सर्वसमावेशक आराखडा तयार करुन त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती सभागृहात बैठक झाली. या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आरोग्यसेवा आयुक्त …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, निकोप, पारदर्शक व भयमुक्त निवडणुकांना राज्यात हरताळ पोलीस, प्रशासन व निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांची गुंडगिरी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी केली जात आहे. उमेदवारांना धमकावले जात आहे, पैशांचे आमिष दाखवून अर्ज भरु दिला जात नाही किंवा मागे घेण्यास भाग पाडले जात आहे. पोलीस यंत्रणा, प्रशासन व निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बटिक बनले आहे. लोकशाहीत निवडणुका निकोप, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल, मुंबईत गेल्या तीन वर्षांत किती बांग्लादेशींना पकडले? किती परत पाठवले ? केंद्रीय गृहमंत्रालयाकडे माहिती उपलब्ध नाही, आरटीआयमधून माहिती पुढे

भारतीय जनता पक्ष प्रत्येक निवडणुकीत बांगलादेशी -रोहिंग्यांचा मुद्दा उपस्थित करून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचे अत्यंत हिन राजकारण करते. मुंबई महानगरपालिका निवडणूक सुरू झाल्यापासून भाजपाचे मंगलप्रभात लोढा व अमित साटम यांनी हिंदु मुस्लीम वाद उकरून काढला. मुंबईत गेल्या तीन वर्षांत किती बांग्लादेशींना पकडले? परत पाठवले ? हा प्रश्नाचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून माहिती अधिकारात …

Read More »

हॉवर्ड ल्युटनिक यांची स्पष्टोक्ती, मोदींनी फोन केला नाही म्हणून अमेरिका-भारत करार रखडला टॅरिफ वाढीनंतर अमेरिका-भारता दरम्यानचा करार रखडला

अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड ल्युटनिक यांनी केलेल्या दाव्याला भारताने शुक्रवारी ‘अचूक नाही’ असे म्हणत फेटाळून लावले. ल्युटनिक यांनी म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट संवाद साधला नाही, म्हणूनच भारत-अमेरिका व्यापार करार होऊ शकला नाही. हॉवर्ड ल्युटनिक यांच्या दाव्यावरून असे दिसून येते की, भारताप्रती …

Read More »

ममता बँनर्जी यांचा इशारा, जर मी तोंड उघडले तर जगात खळबळ उडेल ईडी कारवाईवरून मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांचा अमित शाह यांना इशारा दिला

तृणमूल काँग्रेसचे राजकीय सल्लागार असलेल्या आय-पॅकच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकल्यानंतर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी इशारा दिला की, जर त्यांच्यावर आणि त्यांच्या सरकारवर एका विशिष्ट मर्यादेपलीकडे दबाव आणला गेला, तर त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कोळसा घोटाळ्यातील सहभाग असल्याचा दावा करत त्याचे तपशील उघड करतील. कोलकाता येथे …

Read More »

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली भारतीय सैन्यदलाची मागणी पूर्ण शत्रूपासून आणि बदलत्या हवामानापासून संरक्षण व्हावे यासाठी दिले ५० कंटेनर

राज्यात सगळीकडे २९ महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेनेने मात्र कर्तव्यभावनेचा विसर पडू दिलेला नाही. भारतीय सैन्यदलाने केलेली मागणी पूर्ण करत त्यांना शिवसेनेच्या वतीने ५० कंटेनर देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यातील ४६ कंटेनर यापूर्वीच सीमेवर रवाना करण्यात आले असून, उर्वरित चार कंटेंनर आज उरणमधून सैन्याच्या हवाली …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, मुंबई पुण्याप्रमाणे नाशिकला देखील इमारतींच्या पुनर्विकासासाठी सारखे नियम नाशिकमधील ८ हजार इमारतींच्या पुनर्विकासाला मिळणार गती

नाशिकमधील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी मुंबई, पुणे आणि ठाण्याप्रमाणे नाशिकसाठीही समान नियम लागू करण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने नाशिक क्रीडाईचे उपाध्यक्ष उदय घुगे यांच्याशी फोनवरून संवाद साधताना त्यांनी हे बदल करण्यास अनुकूलता दर्शवली. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आज उद्योग मंत्री …

Read More »

वंचित बहुजन आघाडीचा ‘लोकसंकल्प’ जाहीरनामा प्रसिद्ध 'राजगृह' येथून घुमला उपेक्षितांचा आवाज; प्रा. अंजली आंबेडकर यांच्या हस्ते केले प्रकाशन

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला आहे. गुरुवारी, ८ जानेवारी रोजी दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ निवासस्थानी पक्षाचा अधिकृत निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. ‘लोकआवाज, लोकसंकल्प, लोकशक्ती’ असे ब्रीदवाक्य असलेल्या या जाहीरनाम्यातून मुंबईतील सामान्य आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. या …

Read More »

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचा इशारा

महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान व मतमोजणीची तयारी आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भाजपाला ओवैसींचा MIM ही चालतो हे भाजपाचे नैतिक अधःपतन अंबरनाथ व अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड

अंबरनाथमधील काँग्रेसच्या १२ नगरसेवकांनी कोणाशीही चर्चा न करता घेतलेली भूमिका अत्यंत चुकीची असून पक्षाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना सज्जड दम देत पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. काँग्रेसने कारवाई केली पण भाजपाने मात्र त्यांना पक्षात सामावून घेतले, यातून भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला आहे. सत्तेसाठी भाजपा कोणत्याही पक्षाशी युती करत असून अकोटमध्ये …

Read More »