Editor

संसदीय स्थायी समितीचा अहवाल, औषध कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन केले औषधाच्या किंमती वाढविल्याप्रकरणी समिती अहवालात ठपका

Medical Expense

रसायन आणि खतांवरील संसदीय स्थायी समितीच्या अहवालानुसार, औषध कंपन्यांनी परवानगीपेक्षा जास्त किंमत वाढवून औषधांच्या किंमत नियमांचे वारंवार उल्लंघन केले आहे. ६ मार्च २०२५ पर्यंत, राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (एनपीपीए) औषध (किंमत नियंत्रण) आदेश (डीपीसीओ), २०१३ च्या परिच्छेद २० अंतर्गत उल्लंघनाची ३०७ प्रकरणे नोंदवली आहेत, जो अनुसूचित नसलेल्या औषधांच्या किंमती वाढ …

Read More »

राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती, कोचिंग संस्थाबाबत मान्सून अधिवेशनात विधेयक कोचिंग संस्थांच्या वाढत्या प्रसारावर उच्च न्यायालयाची विचारणा

कोचिंग संस्थांचे नियमन करण्यासाठी दाखल केलेल्या जनहित याचिकेच्या संदर्भात, राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की त्यांनी या मुद्द्यावर एक मसुदा विधेयक तयार केले आहे आणि हे विधेयक पावसाळी अधिवेशनात राज्य विधानसभेसमोर मांडले जाण्याची शक्यता आहे. १९९९ मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेत राज्यात विविध खाजगी कोचिंग सेंटर्स कोणत्याही नियामक यंत्रणेशिवाय …

Read More »

आठ महिन्यांच्या गर्भवती असलेल्या अल्पवयीन मुलीला गर्भपात नाकारला वैद्यकीय मंडळाचा अहवालानंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

जे.जे रुग्णालयाच्या वैद्यकीय मंडळाने दाखल केलेल्या वैद्यकीय अहवालाला ग्राह्य धरून लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या ३२ आठवड्यांच्या गर्भवती असलेल्या अल्पवयीन मुलीची गर्भपात करण्याची मागणी उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. गर्भधारणेच्या या टप्प्यावर गर्भपात केल्यास भविष्यातील गर्भधारणेवर परिणाम होईल आणि या टप्प्यावर गर्भपातास परवानगी दिली तरीही बाळ जिवंत जन्माला येईल, हा वैद्यकीय मंडळाच्या …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, दावोसमध्ये करार केलेल्या १९ प्रकल्पांना अतिरिक्त विशेष प्रोत्साहने राज्यात सुमारे ३ लाख कोटींची नवीन गुंतवणूक येणार

दावोस २०२५ मध्ये महाराष्ट्रासोबत सामंजस्य करार केलेल्या एकूण १७ प्रकल्पांना सामुहिक प्रोत्साहन योजनेबरोबरच थ्रस्ट सेक्टर  व उच्च तंत्रज्ञानावर आधारित धोरणानुसार अतिरिक्त विशेष प्रोत्साहने देण्यास तसेच अन्य २ प्रकल्पांना त्यांच्या गुंतवणुकीनुसार अतिविशाल प्रकल्पाला विशेष प्रोत्साहने देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीत मंजुरी देण्यात आली. या 19 प्रकल्पामधून रूपये ३,९२,०५६ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, एखादा सगा सोयरा जरी आला तरी कारवाई करणार अमली पदार्थ नियंत्रणासाठी शाळा, महाविद्यालयात अँटी नार्कोटिक्स क्लबची स्थापना

देशाला नव्हे, तर जगाला हेवा वाटावा, असा समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे. या राज्यात कुणावरही अन्याय होणार नाही, याठिकाणी केवळ प्रगती नांदेल, ही काळजी शासन घेत आहे. संविधान सगे आणि राज्याची १३ कोटी जनता सोयरे असल्याच्या भावनेतून सर्वोत्तम महाराष्ट्र निर्माण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

प्रताप सरनाईक यांची स्पष्टोक्ती, जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नंबर प्लेट प्रक्रिया गतीमान विधान परिषदेतील प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या तरतुदीनुसार, जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट (एचएसआरपी) बसवणे बंधनकारक आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांना एचएसआरपी बसवण्याची योजना आखण्यात आली आहे. २०१९ नंतर नोंदणीकृत सर्व नव्या वाहनांना निर्माता कंपन्यांकडूनच एचएसआरपी बसवून देण्यात आल्या आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी …

Read More »

अजित पवार म्हणाले, ‘अ‍ॅग्री हॅकॅथॉन’द्वारे राज्यातील कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण क्रांती घडेल नवकल्पक संशोधकांना संधी मिळून कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल

राज्यातील शेतकऱ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी कृषी क्षेत्रात कृत्रिम बुध्दीमत्ता (एआय) सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर गरजेचा आहे. कृषि हॅकाथॉनच्या माध्यमातून राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स, कृषितज्ज्ञ आणि शेतकरी बांधवांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या, संस्थांच्या मदतीने शासनस्तरावर करण्यात येणार आहे. या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांचे …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा इशारा, संविधान बदलण्याचा प्रयत्न कराल तर सत्ता बदलली जाईल संविधानाची पायमल्ली केली जात आहे, सत्ताधाऱ्यांनी अंतर्मुख व्हावे

भारत या देशाचे नागरिक म्हणून आपल्याला काय अधिकार आहेत, आपली कर्तव्य काय आहे हे आपल्याला संविधानाने शिकवले. कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा म्हणून सर्वश्रेष्ठ असलेला ग्रंथ संविधान आहे अस काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. भारतीय गणराज्याच्या ७५ व्या वर्षानिमित संविधानाची गौरवशाली वाटचाल या प्रस्तावावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य …

Read More »

कालच्या राड्यानंतर स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा याचं आणखी एक नवं गीत शिंदे गटाला पुन्हा एकदा डिवचलं

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारीत ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी आखोंपे चष्मा हे गाणं काल स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी रिलिज केलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संबधित रेकॉर्डिंग स्टुडिओवर हल्ला करत मोठ्या प्रमाणावर नासधुस आणि तोडफोड केली. या राड्यानंतर कुणाल कामरा यांनी आणखी एक …

Read More »

वर्षा गायकवाड यांचा आरोप, कोळीवाडे व गावठाणांना झोपडपट्टी घोषीत करून मुंबईच्या भूमिपुत्रांवर अन्याय मुंबईतील सर्व गावठाणे आणि कोळीवाड्यांचे तातडीने मॅपिंग करा !

मुंबईतील गावठाणे आणि कोळीवाडे हे मुंबईच्या अस्तित्वाचे आणि सांस्कृतिक वारशाचे अविभाज्य भाग आहेत.मात्र, मुंबईचा तुकड्या-तुकड्याने लिलाव करण्याच्या कटात गुंतलेल्या या सरकारने भूमिपुत्रांवर घाला घातला आहे. गावठाणे आणि कोळीवाडे हे स्लम नाहीत असा स्पष्ट शासन निर्णय (GR) असूनही, त्यांना स्लम घोषित करून भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा आणण्याचे आणि या भागांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजना लागू करण्याचे …

Read More »