Editor

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालयांना आदेश, फाशीसंदर्भात सहा महिन्यात निर्णय घ्या निकालास तीन-चार वर्षे घेत असल्याने डिक्री निष्पळ

सर्वोच्च न्यायालयाने आज (६ मार्च) सर्व उच्च न्यायालयांना जिल्हा न्यायव्यवस्थेतील सर्व प्रलंबित फाशीच्या याचिकांची माहिती मागविण्याचे निर्देश दिले. अंमलबजावणी न्यायालये योग्य आदेश देण्यासाठी तीन ते चार वर्षे घेत आहेत, ज्यामुळे डिक्रीधारकाच्या बाजूने असलेला संपूर्ण डिक्री निष्फळ होत आहे, असे निरीक्षण नोंदवल्यानंतर न्यायालयाने हे निर्देश दिले. न्यायालयाने उच्च न्यायालयांना प्रलंबित फाशीच्या …

Read More »

उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, अँटिलिया प्रकरणी अटकेसाठी मंजुरीची आवश्यकता नाही बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेचा अर्ज फेटाळताना न्यायालयाचे निरीक्षण

अँटिलिया स्फोटकं आणि व्यापारी मनसुख हिरण हत्येप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला अटक करण्यात आली. तेव्हा, तो अधिकृत कर्तव्य बजावत नव्हता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी कोणत्याही पूर्व मंजुरी किंवा परवानगीची आवश्यकता नव्हती, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने सचिन वाझेची याचिका फेटाळून लावताना नोंदवले. उच्च न्यायालयाने सांगितले की, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराबाहेर जेव्हा …

Read More »

निर्माता दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट धनादेश न वटण्याचे प्रकरणी न्यायालयाने जारी केले वॉरंट

धनादेश न वटण्याचे प्रकरणी चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा तुरुंगवासाची शिक्षा स्थगित करण्याची याचिका मुंबईतील न्यायालयाने फेटाळून लावली आणि वर्माविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही बजावले. जानेवारी महिन्यामध्ये वर्मा यांना न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती तसेच दंडही ठोठावला होता. यापूर्वी २१ जानेवारीला, अंधेरीच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी वर्मा यांना तीन महिने तुरुंगवास आणि तीन लाख ७२ …

Read More »

एकनाथ शिंदे यांची ग्वाही, बेघर होवून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत हक्काचे घर गोळीबार खार भागातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार

रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करून बाहेर गेलेल्या नागरिकांना मुंबईतच हक्काचे घर मिळवून देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. मुंबईतील खार (पूर्व) येथील पुनर्विकास प्रकल्पबाबत सदस्य वरुण सरदेसाई यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली. यावेळी चर्चेत सदस्य अमित देशमुख यांनीही सहभाग घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सामान्य रहिवाशाला …

Read More »

पुणे शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

पुणे शहर, जिल्हाच नव्हे, तर राज्यात कर्क रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कर्करोगाला नियंत्रित करण्यासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत आहे. कर्क रुग्णास कमी खर्चात उपचार मिळण्यासाठी शासनाच्यावतीने पुणे शहरात कर्करोग रुग्णालय उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे शहरातील ससून …

Read More »

आदिवासी पाड्यातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देण्यास प्राधान्य आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांची माहिती

आदिवासी समूहांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक परिस्थितीत सुधारणा घडवून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी  केंद्र व राज्य शासनामार्फत विविध लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आदिवासी बांधवांना विकासाची संधी मिळाली पाहिजे हीच शासनाची भूमिका आहे. त्यांना मूलभूत सोयीसुविधा प्राधान्याने देण्यात येणार असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. रायगड जिल्ह्यातील आदिवासी …

Read More »

काळू धरण पूर्ण करून ठाणे महानगराची पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा व विटावा परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासन विविध प्रयत्न करीत आहे. काळू धरण पूर्ण होईपर्यंत पर्यायी उपाययोजनांचा अवलंब करून या समस्येवर मात करण्यात येईल. काळू धरण पूर्ण करुन ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. ठाणे महापालिका …

Read More »

अखेर आरएसएसच्या भैय्याजी जोशी यांच्याकडून त्या वक्तव्याप्रकरणी सारवा सारव माझीही मातृभाषा मराठीच

मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे वरिष्ठ नेते तथा माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी यांनी त्यांच्या त्या वक्तव्यावरून राजकिय पडसाद उमटले. त्यामुळे अखेर त्यांच्या वक्तव्यातून गैरसमज निर्माण झाल्याचे सांगत वक्तव्यावरून सारवासारव केली. यावेळी पुढे बोलताना भैय्याजी जोशी म्हणाले की, मुंबईतील उपनगर घाटकोपर येथे काल एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या वक्तव्याचा गैरसमज …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, जलसंधारण विभाग मोहित कंबोज चालवतो…कोण आहे हा ? विभागाचे आयएएस अधिकारी दिपक कपूर विचारल्याशिवाय पाणीही पित नाहीत

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जलसंपदा विभाग मोहित कंबोज हा चालवत असल्याचा गंभीर आरोप करत हा कोण आहे मोहित कंबोज त्याला विचारल्याशिवाय विभागाचे आयएएस अधिकारी दिपक कपूर हे पाणीही पीत नाहीत असा गंभीर आरोप आज विधान परिषदेत केला. त्यामुळे विधान परिषदेत सरकारबाहेरील मात्र …

Read More »

एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, मुंबईतील धोकादायक आणि जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला गती देणार ६ महिन्यासाठी पहिल्यादा जमिन मालकाला संधी

मुंबई शहरातील धोकादायक, जुन्या आणि मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या जलद पुनर्विकासासाठी लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करून या पुनर्विकासाला गती देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  विधानसभेत दिले. विधानसभेत सदस्य सर्वश्री अमिन पटेल, पराग आळवणी, अजय चौधरी, योगेश सागर, सुनिल राऊत, जयंत पाटील, नाना पटोले, अतुल भातखळकर, छगन भुजबळ यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. याला उत्तर …

Read More »