सोलापूर जिल्ह्यातील सुरज जाधव या तरूण शेतकऱ्याने वीज बिल आणि तोडणीवरून आत्महत्या केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहातच घोषणा केली होती शेतकऱ्यांच्या वीजेची तोडणी करणार नाही म्हणून असे असताना तरीही वीज तो़डणी केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत चालू बिलात चालू गिरी करू नका नाहीतर …
Read More »फडणवीस म्हणाले, “पोलिस मस्तवाल होतील”, तर गृहमंत्री म्हणाले “चौकशी होईल” भाजपा आमदार रवि राणावरील गुन्ह्या प्रकरणी विधानसभेत गोंधळ
भाजपा समर्थक आमदार रवी राणा यांच्या विरोधात पोलिसांनी गंभीर दाखल केले. परंतु त्यावेळी ते दिल्लीत होते. तरीही त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. जर आमदारांवर अशा पध्दतीचे पोलिसांकडून गुन्हे दाखल होत असतील तर त्या विषयीची दाद कोणाकडे मागायची असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत रवि राणा यांना सभागृहात …
Read More »युध्द परिस्थितीत काँग्रेसनेही नागरीकांना आणले, पण भाजपाच्या प्रवृत्तीची किळस येते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
जवळपास ११ दिवसांपासून युक्रेनविरुद्ध रशियाने सुरु ठेवलेल्या लष्करी कारवाईमुळे जवळपास १० हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये अजूनही अडकलेले आहेत. पण या विद्यार्थ्यांना मायदेशी सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकांची भाषणे व उद्घटाने करत फिरत असल्याची बाब गंभीर असल्याची टीका माजी मुख्यमंत्री तथा …
Read More »चप्पल घटनेवरून फडणवीस म्हणाले, ती माणसे चिल्लर तर नितेश राणेंचा NCP ला इशारा पोलिसांना फक्त २४ तास सुट्टी द्या मग कळेल
पुणे मेट्रोसह अनेक विकास कामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात झाले. मात्र पिंपरी-चिंचवड येथे काही कार्यक्रमाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी जाताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर एकाने चप्पल फेकून मारली. परंतु सुदैवाने फडणवीस हे गाडीत असल्याने चप्पल गाडीवर पडली. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले …
Read More »चाकरमान्यांच्या पोटाची काळजी घेणाऱ्या डबेवाल्यांना मिळाले हक्काचे ‘भवन’ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून डबेवाल्यांच्या व्यवस्थापन कौशल्याचे कौतुक
बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. त्या नसा असतील तर मुंबईतील डबेवाले रक्त आहेत, अशा शब्दात पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील डबेवाल्यांच्या कार्याचे कौतुक केले. मुंबई महानगरपालिकेच्या शेरली, बांद्रा व्हिलेज, बांद्रा (पश्चिम) येथील समाज कल्याण केंद्राची २८६.२७ चौ. मी. क्षेत्रफळाची जागा मुंबई टिफिन बॉक्स …
Read More »खासदार अमोल कोल्हे म्हणाले, रोखठोक अजित दादांनी अंजन घालण्याचे काम केले राज्यपालांविरोधात केलेल्या तक्रारीवरून कोल्हेंकडून अजित पवारांचे कौतुक
पुणे मेट्रोसह विविध योजनाच्या लोकार्पण सोहळ्यात ते ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि दस्तुरखुद्द राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात त्यांचीच तक्रार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांचे कौतुक करत, रोखठोक अजित पवारांनी डोळ्यात अंजन घालण्याचे काम …
Read More »शरद पवारांचा फडणवीसांना टोला, काहीजण येतो येतो म्हणतात, पण मी कसा येवू देईन उस्मानाबाद मधील कार्यक्रमांत पवारांची राज्यपालांवरही टीका
काही जण सारखं म्हणत होते मी परत येतो परत येतो. पण मी कसा येवू देईन असा, सगळा बंदोबस्त केला असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा उत्तर कारभार सुरु असल्याचे प्रशस्ती पत्रकही देवून टाकले. उस्मानाबाद येथे …
Read More »धारावीच्या नावाखाली रेल्वेला दिलेल्या ८०० कोटींची एसआयटीमार्फत चौकशी करा रश्मी शुक्लांवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार: नाना पटोले
धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. पुनर्वसन प्रकल्पासाठीच्या ४५ एकर जमिनीसाठी फडणवीस सरकारने रेल्वेला ८०० कोटी दिले. परंतु आजपर्यंत ती जमीन राज्य सरकाला मिळालेली नाही आणि ८०० कोटी रुपयेही परत मिळाले नाहीत. ही जनतेच्या पैशाची लूट असून या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी …
Read More »महाविकास आघाडीतील “हे” मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारण्यात आघाडीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत गैरहजर राहण्यात गडाख, शिंगणे, सामंत आघाडीवर
मंत्रिपद मिळवण्यासाठी पक्ष श्रेष्ठीकडे जोरदार लॉबिंग करायचे, श्रेष्ठींना गळ घालायची, स्पर्धकांना मागे टाकण्यासाठी राजकीय डावपेच आखायचे आणि एकदा मंत्रिपद मिळाले की मग मंत्रिमंडळाच्या बैठकांना गैरहजर रहायचे धक्कादायक माहिती राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या बाबतीत पुढे आली आहे, राज्यातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बाबतीत. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब यांनी आतापर्यंत बोलावलेल्या …
Read More »पटोलेंचा आरोप, नरेंद्र मोदी हे महापुरुषांपेक्षा मोठे असल्याचे दाखविण्याचा भाजपा प्रयत्न महाराष्ट्र आणि महापुरुषांचा अवमान भाजपा करतेय
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले हे आमचे दैवत आहेत. आमच्या या दैवतांचा भारतीय जनता पक्ष, नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने अवमान करत असतात. कर्नाटकातील भाजपा सरकारही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मुंबईतील प्रदेश काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार …
Read More »
Marathi e-Batmya