Breaking News

४७ हजार मजुरांच्या मानसिक स्वास्थासाठी आरोग्य विभागाचा असाही पुढाकार ९४४ शिबीरात मानसिक समुपदेशन

मुंबई: प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या स्थलांतरीत मजूरांचे मानसिक आरोग्य स्वस्थ रहावे यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. आधीच रोजगार बंद, घरच्यांपासून दूर आणि आर्थिक अडचणीमुळे या कामगारांना मानसिक अनारोग्याला सामोरे जावे लागत असल्याने विभागाने पुढाकार घेतला. सुमारे ९४४ निवारागृहांमध्ये हे मजूर राहत असून त्यांना प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधा पुरविल्या …

Read More »

दिलासादायक बातमी: अखेर केंद्राने राज्य सरकारचे ऐकले ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ केंद्राने मान्यता दिल्याची आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीला मान्यता द्यावी आणि रूग्णांची माहिती जमा करण्यासाठी पुल टेस्टींग करण्याची मागणी राज्य सरकारकडून सातत्याने केंद्राकडे करण्यात येत होती. अखेर राज्य सरकारच्या या दोन्ही मागण्यांना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन यांनी मान्यता दिली. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला. कोरोना …

Read More »

माजी म्हणाले विद्यमान मुख्यमंत्र्यांना, कर्ज वसूली ६ महिने थांबवा मुख्यमंत्री ठाकरेंकडे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली पत्राद्वारे मागण्यांची यादी

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच व्यवहार बंद आहेत यापार्श्वभूमीवर केंद्राच्या आदेशानुसार नागरिकांकडून करण्यात येणाऱ्या कर्जवसूलीवर तीन महिन्यासाठी कोणताही हप्ता भरू नये यासाठी सुट देण्यात आली. मात्र ही तीन महिन्याची सूट पुरेशी नसून ही मुदत सहा महिन्यापर्यत वाढविण्यात यावी आणि …

Read More »

राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ ७७८ नवीन रुग्णांचे निदान एकूण ६४२७ वर पोहोचली

मुंबई : प्रतिनिधी आज राज्यात कोरोनाबाधीत ७७८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ६४२७ झाली आहे. आज ५१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ८४० रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ५३०४ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९६ …

Read More »

निराधार, श्रावणबाळसह अन्य योजनेचे निवृत्तीवेतन तीन महिन्याचे अॅडव्हान्स सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंडे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन अशा पाच योजनेच्या बाबतीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी महत्वपूर्ण निर्णय …

Read More »

बांधकाम कामगारांनो २००० रू. मदतीसाठी अर्ज व दस्तावेज नको कामगारांची फसवणूक केल्यास कारवाई

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडॉऊन सुरू आहे. या कालावधीत रोजगार बुडालेल्या इमारत व इतर बांधकाम मजुरांना दोन हजार रुपये थेट बँक खात्यात (DBT पध्दतीने) वाटप करण्यात येत आहेत. बांधकाम मजुरांनी यासाठी कोणताही अर्ज, बँकेचा तपशील, आधार क्रमांक नव्याने सादर करण्याची आवश्यकता नाही, असे महाराष्ट्र इमारत व इतर …

Read More »

परप्रांतीय मजूरांसाठी ३मे नंतर मुंबई, पुण्यातून विशेष गाड्या सोडा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीची मुदत ३ मे रोजी संपत आहे. टाळेबंदीची मुदत संपल्यानंतर रेल्वेसेवा सुरु झाल्यास, महाराष्ट्रात ठिकठिकाणी थांबलेले परप्रांतीय मजूर बांधव आपापल्या गावी परतण्यासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडण्याची व त्यामुळे गर्दी उसळून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने मुंबई व पुणे येथून …

Read More »

राज्यातला वेग सात दिवसांवर : पाच हॉटस्पॉट कमी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून हा कालावधी सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंध आणि उपचार केले जात आहेत. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही. मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला …

Read More »

काँग्रेसकडून पालघरप्रकरणातील भाजपा कार्यकर्त्यांचे कनेक्शन उघड प्रवक्ते सचिन सावंत यांनी फोडले बिंग

मुंबई: प्रतिनिधी पालघरमधील ज्या गडचिंचले गावात तिघांच्या हत्येची दुर्दैवी घटना घडली. त्या ग्रामपंचायतीवर १० वर्षांपासून भाजपाची सत्ता असून चित्रा चौधरी ह्या सध्या तिथल्या सरपंच आहेत. या घटनेत भाजपाचे स्थानिक बुथ कार्यकर्त्ये असून त्यांच्या नावाची अधिकृत यादी भाजपाने त्यांच्या पक्षाच्या डहाणू फेसबुकवर घोषित केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी …

Read More »

राज म्हणाले मुख्यमंत्री ठाकरेंना, महसूलासाठी तरी हॉटेल, वाईन शॉप उघडा महिन्याकाठी १२५० कोटी रूपयांचा महसूल न गमाविण्याची पत्राद्वारे विनंती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना लॉकडाऊनमुळे सर्व अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. हॉटेल ही मुंबईकरांसाठी चैनीची गोष्ट नव्हे तर गरज आहे. त्यातच माफक आणि स्वस्त दरात जेवण मिळणारी हॉटेल्स बंद असल्याने नागरिकांचीही गैरसोय होत आहे. यापार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेत धुगधुगी निर्माण करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात जेवण मिळण्यासाठी हॉटेल्स आणि वाईन शॉप्स सुरु …

Read More »