Breaking News

राज ठाकरे आणि शरद पवार यांचे स्क्रिप्ट सेम टु सेम शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषा सेम टु सेम आहे. त्यामुळे राज ठाकरे कोणाच्या स्क्रिप्टनुसार सध्या भाषणे करीत आहेत हे आता वेगळे सांगायची गरज नसल्याची टीका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. शरद व पवार व राज ठाकरे यांच्या वेगवेगळ्या …

Read More »

नरेंद्र मोदींची ‘ती मुलाखत म्हणजे प्रतिमा संवर्धनाचा अत्यंत विनोदी प्रकार काँग्रेस प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी प्रसिद्धीपासून दूर राहून शांतपणे आपले काम करीत असल्याची शेखी मिरवणाऱ्या रा. स्वं. संघाचे स्वयंसेवक नरेंद्र मोदी यांचा प्रसिद्धीचा निदिध्यास हा आश्चर्यकारक आहे. काल दिवसभर दूरदर्शनच्या कृपेने विविध वाहिन्यांवर दाखविल्या गेलेल्या सिनेनट अक्षयकुमारने घेतलेल्या मोदी यांच्या मुलाखतीने हे सिद्ध झाले आहे. ज्यांच्या भाषणांमध्ये राजकारण सोडून एकही वाक्य नसते अशा …

Read More »

वारे फडणवीस सरकार तेरा खेल! कामगार उपाशी कर्ज देणारे तुपाशी माथाडी कामगार, सुरक्षा रक्षक पुन्हा पतपेढ्या, बँकाच्या तावडीत

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूका नजरेसमोर ठेवत राजकिय आर्शीवादाने प्रेरित पतसंस्था, खाजगी बँकांकडून माथाडी कामगार आणि सुरक्षा रक्षकांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी मार्च महिन्यात शासन निर्णय काढला. मात्र त्यास एक महिन्याचा कालावधी उलटून जात नाही. तोच ही लुबाडणूक थांबविण्यासाठी काढण्यात आलेल्या शासन निर्णयालाच स्थगिती देण्याचा अजब प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून …

Read More »

आता मनसेचा पर्दाफाश भाजपा करणार अरे लाव तो व्हीडीओ २७ तारीखला दाखविणारः विनोद तावडे

मुंबईः प्रतिनिधी लाव रे तो व्हिडिओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या या एका वाक्याने भारतीय जनता पार्टीची झोप उडाली असून, आता भाजपा देखील राज ठाकरे यांच्या स्टाईलमध्ये मनसेला उत्तर देणार आहे. येत्या २७ एप्रिलला म्हणजेच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपा सभेमध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरे यांच्या सभांची पोलखोल …

Read More »

मोदीला घालवून बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ग्वाही

नाशिक-निफाडः प्रतिनिधी या वयात फिरतो म्हणजे मी काय म्हातारा झालो का? असा सवाल करतानाच काय काळजी करु नका मी भक्कम आहे. या मोदीला घालवल्याशिवाय आणि बळीराजाचे राज्य आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी निफाडच्या जाहीर सभेत जनतेला दिली. या जाहीर सभेला पवार यांच्याबरोबर …

Read More »

राणे म्हणतात अब आयेगा मजा..सबका हिसाब होगा नारायण राणे आत्मचरीत्र लिहीत असल्याचे नितेश राणे यांचे ट्विट

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या राजकारणातील वादळी व्यक्तीमत्व असलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आत्मचरित्र लिहीणार आहेत. या आत्मचरित्राच्या माध्यमातून सगळ्यांचीच गुपिते बाहेर पडणार असल्याचे भाकित त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी एका ट्विटद्वारे केले असून अब आयेगा मजा..सबका होगा हिसाब असल्याचे सांगत राणेंचे चरित्र स्फोटक असल्याचा गर्भित इशारा दिला. त्यामुळे …

Read More »

आचारसंहिता भंग करणाऱ्या पंतप्रधानांवर आयोगाने कारवाई करण्याची हिंमत दाखवावी! काँग्रेस प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे घटना, कायदे, प्रथा व परंपरा मानणारे म्हणून कधीच प्रसिद्ध नव्हते. या निवडणुकांच्या काळात देखील त्यांनी हेच सिद्ध करण्याचा चंग बांधला आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केला आहे. मिरवणुकीने मतदानाला जाणे किंवा मतदान करुन आल्यानंतर एक …

Read More »

मनसे कार्यकर्त्ये घेतात काँग्रेसकडे “लक्ष्मी” दर्शन ! ऐका संभाषण मनसे कार्यकर्त्यांचे मनसेच्या जिल्हाध्यक्षाने काँग्रेस उमेदवाराकडून मदतीसाठी पैसे घेतल्याचे उघड

औरंगाबादः जगदीश कस्तुरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या विरोधात आगपाखड करण्यासाठी संपूर्ण राज्य पिंजून काढत आहेत. तर दुसऱ्याबाजूला मनसेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षाने काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्याकडून घशघशीत रक्कम घेतल्याचे उघडकीस आले असून आर्थिक व्यवहाराची चर्चा करत असतानाचे संभाषण मराठी ई-बातम्याच्या हाती …

Read More »

ईव्हीएम मशिन्स हँक करून गडबड केली जावू शकते शरद पवार यांच्यासह सर्व विरोधी पक्षांना भीती

मुंबईः प्रतिनिधी लोकांचे मत सरकारविरोधी आहे. हे अनेक मतदारसंघात फिरल्यानंतर आपल्याला समजले. परंतु ईव्हीएम मशीन हॅक करुन किंवा ईव्हीएम मशीनमध्ये गडबड केली जाऊ शकते अशी भीती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. काल बारामती मतदारसंघातील प्रचाराची मुदत संपली. नंतर शरद पवार यांनी मतदार नसल्यामुळे मतदारसंघात …

Read More »

उध्दव ठाकरे, संजय राऊत यांना अटक करा मराठा क्रांती मोर्चा व्यंगचित्र प्रकरण न्यायालयाचे आदेश

पुसदः प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाजाने राज्यभर क्रांती मोर्चे काढले. या दरम्यानच्या काळात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकात क्रांती मोर्चाचे विडंबन होणारे व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आले. या व्यंगचित्रप्रकरणी पुसद न्यायालयाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, दै.सामनाचे संपादक संजय राऊत आणि व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई, राजेंद्र भागवत यांच्याविरोधात पुसद न्यायालयाने अटक …

Read More »