Breaking News

प्लास्टीक पुर्नवापर आणि कचरा प्रश्नी कोकाकोलाची सरकारसोबत कामाची तयारी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्रा’साठी उद्योग जगत उत्सुक असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मुंबईत पुढील महिन्यात होणाऱ्या मॅग्नेटिक महाराष्ट्र या उद्योग परिषदेसाठी जागतिक समुहात अनुकुल वातावरण तयार करण्यात यश मिळत असून अनेक आघाडीच्या संस्था-समुहांनी या परिषदेत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान राज्य सरकारसोबत अन्न प्रक्रिया, प्लास्टिकचा पुनर्वापर आणि कचरा व्यवस्थापन या क्षेत्रात राज्य सरकारसोबत काम करण्याची तयारी कोकाकोला समुहाने …

Read More »

 कडेकोड बंदोबस्तात पडद्यावर अवतरणार ‘पद्मावत’ मुंबईसह राज्यातील चित्रपटगृहांना पोलिस छावणीचे स्वरूप

मुंबई: प्रतिनिधी प्रथम राजकारणाच्या आखाड्यात आणि नंतर न्यायदेवतेच्या मंदिरात उभ्या ठाकलेला ‘पद्मावती’ हा चित्रपट शीर्षक बदलून म्हणजे ‘पद्मावत’ या शीर्षकाने प्रदर्शित करण्यात येत आहे. राजपूत आणि करणी सेनेने दिलेल्या इशाऱ्यामुळे विविध राज्यांनी तसेच थिएटर मालकांनी सुरक्षेच्या कारणावरून ‘पद्मावत’च्या प्रदर्शनास नकार दिल्याने वादात अडकलेला हा चित्रपट अखेर प्रदर्शित होत आहे. कोणत्याही …

Read More »

पुरस्कार विजेत्यांनाही मिळणार मानधन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची घोषणा

मुंबईः प्रतिनिधी दलित, आदीवासी, मागासवर्गीयांच्या हिताच्यादृष्टीने सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींचा राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. आता सामाजिक न्याय विभागाकडून पुरस्कार प्राप्त झालेल्या आजवरच्या सर्वच पुरस्कार्थींना यंदाच्या वर्षीपासून मासिक सातशे पन्नास रूपये मानधन देण्यात येणार असल्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आज …

Read More »

संविधानाच्या रक्षणासाठी स्वातंत्र्य लढ्याप्रमाणे पुन्हा लढा द्यावा लागेल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे प्रतिपादन

जळगांव : प्रतिनिधी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेसला इंग्रजांशी लढा दिला होता. आता देशाचे संविधान वाचवण्यासाठी पुन्हा लढा द्यावा लागणार असल्याचे प्रतिपातन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी करत या लढ्यासाठी काँगेस कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे असे आवाहन त्यांनी केले. जळगांवच्या गोदावरी अभियांत्रिकी विद्यालयाच्या प्रांगणात आज काँग्रेसचे दुसरे जिल्हास्तरीय शिबिर आयोजित …

Read More »

तंबाखूमुक्त शाळा, महाविद्यालयांसाठी ६ फेब्रुवारीपासून विशेष मोहीम टोल फ्रि नंबर सुरु करण्याचे गृह राज्यमंत्री डॉ.पाटील यांचे आदेश

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांचा परिसर गुटखा, सिगारेट्स आदी तंबाखूजन्य पदार्थांपासून मुक्त करण्यासाठी ६ फेब्रुवारी २०१८ रोजी पासून एक विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश देत या परिसरात विक्री करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी एक विशेष टोल फ्री क्रमांक सुरू करण्याचे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी पोलिस, अन्न व औषध प्रशासनाला दिले. …

Read More »

विरोधकांच्या रँलीला प्रतित्तुर देणाऱ्या तिरंगा यात्रेला मुख्यमंत्री उपस्थित राहणार मुख्य्मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार संविधान सन्मान सभा

मुंबई : प्रतिनिधी केंद्रात आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कारभाराच्या विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल यासह अनेक राजकिय पक्षांकडून संविधान बचाव रँलीचे प्रजासत्ताक दिनादिवशी काढण्यात येणार आहे. विरोधकांच्या या रँलीला प्रतित्तुर म्हणून सत्ताधारी भाजपकडून तिरंगा यात्रा काढण्यात येणार असून संविधान सन्मान सभेत त्याचे रूपांतर करून त्याला …

Read More »

३०० हून अधिक कक्ष अधिकाऱ्यांचा सहसचिव होण्याचा मार्ग मोकळा उच्च न्यायालयाच्या निकालाने थेट भरती झालेल्यांना दिलासा

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या प्रशासनाचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात थेट भरतीतून नोकरीस लागलेल्या असंख्य कक्ष अधिकाऱ्यांना पात्रता असूनही केवळ सेवा ज्येष्ठता आणि पदोन्नतीतून पुढे येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे लवकर पदोन्नती मिळत नव्हती. त्यामुळे मंत्रालयात थेट भरती झालेल्या कक्ष अधिकाऱ्यांना पदोन्नतीपासून दूर रहावे लागत होते. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्याबाबत निर्णय घेत थेट कक्ष अधिकारी …

Read More »

संरक्षण उत्पादन क्षेत्रातील गुंतवणूकीसाठी ब्रिटीश कंपनी उत्सुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने संरक्षण क्षेत्रात परकीय गुंतवणूकीला १०० टक्के परवानगी दिल्याने महाराष्ट्रात  संरक्षणविषयक उत्पादनांची निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्याची तयारी ब्रिटीश कंपनी बीएई सिस्टीम्सने अनुकुलता दर्शविली आहे. तसेच यासाठी लागणारे आवश्यक ते मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेनर हॉकची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीएई …

Read More »

शिवसेना बदलतेय…? राष्ट्रीय कार्यकारणीचे आयोजन आणि माध्यमांना खुला प्रवेश

मुंबई: प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात नेहमीच कुतुहल शिवसेनेबाबत आहेत. शिवसेनेचा दसरा मेळावा सोडला तर आतापर्यत एकाही पक्ष संघटनेच्या कार्यक्रमात प्रसारमाध्यमांना खुले आमंत्रण नव्हते. मात्र यावेळी राष्ट्रीय कार्यकारणीच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच प्रसार माध्यमांना खुला प्रवेश देत शिवसेनेत सारे काही (आर) पारदर्शक असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न झाल्याने शिवसेना बदलतेय का? असा प्रश्न शिवसैनिकांबरोबर सर्वसामान्यांच्या मनात …

Read More »

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात २९ जानेवारीपासून आंदोलन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी दररोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले जात आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांची लूट सुरु असून काँग्रेस पक्ष या दरवाढीविरोधात २९, ३०, ३१ जानेवारी रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली. दादर येथील टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राज्याचे माजी …

Read More »