सुरेखा कुडची ने ज्योतिबाचे दर्शन घेतल्यावर चमचमीत मिसळवर मारला ताव प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने चाखली कोल्हापूरची लोकप्रिय मिसळ

मालिका, चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या ढंगाच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे सुरेखा कुडची. केवळ मनोरंजनाच्या माध्यमातून नव्हे तर ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमातदेखील आपली खेळी दाखवून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. तसेच सुरेख कुडची नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

सुरेखा कुडची सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करून त्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आताही त्यांनी शेअर केलेल्या एका पोस्टची चर्चा सुरु आहे.मुख्य म्हणजे यावेळी सुरेखा कुडची यांनी ज्योतिबाचे दर्शन घेतल्यानंतर मस्त चमचमीत मिसळवर ताव मारला. कोल्हापूरच्या जगप्रसिद्ध फडतरे मिसळ सेंटरला भेट देऊन सुरेखा यांनी तेथील काही फोटो पोस्ट केले आहेत.

यावेळी सोशल मीडियावर शेलार केलेल्या पोस्टमध्ये कॅप्शनमध्ये लिहिलंय, ‘कुडाळला शूटिंग संपवून कोल्हापूरला आले ते थेट फडतरे मिसळ खायला… कोल्हापूरची ही मिसळ म्हणजे नाद करायचा नाय… २० min वेटींगला थांबले पण शेवटी मिसळ खाऊनच बाहेर पडले…’. सुरेखा कुडची यांचे हे दोन्हीही व्हिडीओ व्हायरल होत आहेत आणि या व्हिडीओवर अनेक चाहते कमेंट करत आहेत.

About Marathi E Batmya

Check Also

IffI2025

IFFI2025 : ५६ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात सुरू

आठ दिवसांचा ५६ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI गुरुवारी गोव्याची राजधानी पणजी येथे एका भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *