उर्फीला जीवे मारण्याच्या धमक्या, स्क्रीनशॉट केले शेअर उर्फीच्या विचित्र ड्रेसकोडला कंटाळून थेट जीवे मारण्याची धमकी

चित्र विचित्र फॅशनमुळे नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री उर्फी जावेद हिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मेलवर दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून उर्फीला धमकी दिली गेलीय.उर्फीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओनंतर हे धमकीचे मेल आले आहेत. भुल भुलैय्या सिनेमातील राजपाल यादवने केलेल्या पंडितासारखा गेटअप उर्फीने केला होता.

उर्फीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्या व्हिडीओवरही उर्फीला अनेकांनी टार्गेट केलं असून अश्लील भाषेतही कमेंट केल्या आहेत.उर्फी जावेद ही नेहमीच वेगवेगळ्या आणि हटके लूकमधले तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करते. तिच्यावर यामुळे अनेकदा टीकाही झालीय. आता तिने भुल भुलैया चित्रपटात राजपाल यादवने केलेल्या पंडितचा गेटअप केला.

हा व्हिडीओ उर्फीने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तिला धमक्या दिल्या जात आहेत. उर्फीने या प्रकरणी मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. भुलभुलैयामधील छोटा पंडितचे कॅरेक्टर तुम्हाला माहितीच असेल. खूप मेहनतीने हॉलोवीन पार्टीसाठी तयार झाले पण जाऊ शकले नाही मग विचार केला व्हिडीओच पोस्ट करावा असं कॅप्शन उर्फीने त्या व्हिडीओला दिलं होतं. मेलमध्ये निखील गोस्वामी याने व्हिडिओ डिलिट कर अन्यथा तुला मारायला वेळ लागणार नाही असं म्हटलंय.

About Marathi E Batmya

Check Also

IffI2025

IFFI2025 : ५६ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात सुरू

आठ दिवसांचा ५६ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव IFFI गुरुवारी गोव्याची राजधानी पणजी येथे एका भव्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *