कंगना राणावतचा ‘तेजस’ चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर आपटला कंगनाच्या तेजस चित्रपटाकडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ

बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत ही तिच्या रोखठोक विधानामुळे जितकी चर्चेत असते तितकी ती तिच्या चित्रपटामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या कंगना तिच्या तेजस या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. नुकताच कंगना राणावत हिचा हा चित्रपट रिलीज झाला असून या चित्रपटाला ओपनिंगला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही.

तेजस चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना कंगना राणावत ही दिसली. हा चित्रपट धमाका करणार असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात देखील आले. मात्र, प्रत्यक्षात ते घडू शकले नाहीये. तेजस चित्रपटाने ओपनिंग डेला २ ते ३ कोटींचे कलेक्शन केले. ओपनिंग डेला चित्रपट १० कोटींच्या आसपास कमाई करण्याचा अंदाजा होता. मात्र, तसे झाले नाही.

आता विकेंडला चित्रपट काही धमाका करणार का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. अनेकांनी कंगनाच्या अभिनयाचे काैतुक केले. येत्या शनिवारी आणि रविवारी या चित्रपटाला प्रेषक कशा रकारे रिस्पॉन्स देतायत हे सुद्धा पाहावे लागणार आहे. सध्या कंगना या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी व्यस्त असल्याचे दिसून येते.

तसेच तेजस चित्रपट पुढील काही दिवसांमध्ये काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरेल. कंगना राणावत सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसली.

About Marathi E Batmya

Check Also

Mohe-Lagi-Lagan-SUN-Neo

सन निओची नवीन सादरीकरण, “मोहे लागी लगन”, सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करेल ज्योतिष आणि वास्तू दोषावर आधारीत मार्गदर्शन करणारी सिरीयल

सन निओ त्यांच्या प्रेक्षकांना “मोहे लागी लगन” हा शो घेऊन येत आहे. प्रसिद्ध ज्योतिषी भावना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *