मलायकाचा ड्रेस पाहून भडकले नेटकरी थेट उर्फीशी केली तुलना मलायकाच्या ड्रेसवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

अभिनेत्री मलायका अरोरा नेहमीच तिच्या आणि अर्जुनच्या त्यामुळे चर्चेत राहत असते अशातच ती तिच्या फॅशन आणि फिटनेसमुळे ओळखली जाते. जिम असो किंवा पार्टी लूक.. मलायकाच्या आऊटफिटचे फोटो सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल होतात. मात्र अनेकदा तिला तिच्या स्टाइलमुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. मलायकाने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती.

या कार्यक्रमात मलायका अत्यंत बोल्ड कपड्यांमध्ये दिसली. तिचा हा अंदाज काहींना अजिबात पसंत पडला नाही. तर काहींनी तिची तुलना थेट उर्फी जावेदशी केली. अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या चित्रविचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते. पण मलायकाचे कपडे पाहिल्यानंतर ‘उर्फी उगाच बदनाम आहे’ अशी प्रतिक्रिया काही युजर्सनी दिली आहे.

या कार्यक्रमात मलायकाने ॲक्वा ब्ल्यू शिमरी ड्रेस परिधान केला होता. मात्र तिचा हा ड्रेस बराच ट्रान्सपरंट होता. कार्यक्रमात पोहोचण्याआधी तिने रेड कार्पेटवर माध्यमांसमोर फोटोसाठी पोझ दिले. तिचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘उर्फी तर उगाच बदनाम आहे, खरे दोषी हेच आहेत’, असं एकाने लिहिलं. तर ‘ही कोणत्या कंपनीची अशी डिझाइन आहे’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.

मलायका तिच्या फॅशनमुळे जितकी चर्चेत असते तितकीच ती तिच्या आणि अर्जुन कपूर च्या नात्यामुळे चर्चेत राहत आहे. अर्जुनला ती गेल्या काही वर्षांपासून डेट करतेय. मध्यंतरीच्या काळात या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र त्यानंतर अर्जुन आणि मलायकाला एकत्र डिनर डेटला गेल्याचं पाहिल्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. अर्जुन आणि मलायका ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असणारी जोडी आहे.

About Marathi E Batmya

Check Also

Mohe-Lagi-Lagan-SUN-Neo

सन निओची नवीन सादरीकरण, “मोहे लागी लगन”, सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करेल ज्योतिष आणि वास्तू दोषावर आधारीत मार्गदर्शन करणारी सिरीयल

सन निओ त्यांच्या प्रेक्षकांना “मोहे लागी लगन” हा शो घेऊन येत आहे. प्रसिद्ध ज्योतिषी भावना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *