‘१२ वी फेल’ चित्रपटाची पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित '१२ वी फेल' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात

विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित बहुप्रतिक्षित १२ वी फेल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग मिळवली आहे. शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या यशस्वी सुरुवातीमुळे चित्रपटसृष्टीतच नव्हे तर प्रेक्षकांनी या चित्रपटाला भ-भरून प्रतिसाद दिला आहे. अतिशय प्रतिभावान विक्रांत मॅसी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहे.

या चित्रपटाबद्दल आधीच बरीच चर्चा होती, ती देखील चित्रपटाच्या रिलीजबरोबरच पाहायला मिळाली. होय, २७ ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल झालेल्या या चित्रपटाने आज बॉक्स ऑफिसवर १ कोटींचा आकडा पार केला आहे. १२ वी फेलने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून जवळपास १. १ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

दिल्ली, पंजाब, मुंबई आणि बेंगळुरू सारख्या प्रमुख शहरांमध्ये या चित्रपटाची प्रेक्षकांनी विशेष प्रशंसा आहे, जिथे चित्रपट चांगली कामगिरी करत आहे. कमी बजेटमध्ये बनवलेल्या चित्रपटासाठी, त्याच्या सुरुवातीच्या दिवशी असा परफॉर्मन्स देणे खूप छान आहे, जे चित्रपटाच्या सुंदर कथेवर पूर्णपणे अवलंबून असते.

या चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीचा खुपमोठा फायदा होत असून मागणी देखील वाढत आहे आणि हे पाहता चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाच्या शोची संख्या देखील वाढवली जात आहे. १२ वी फेल ची यशोगाथा म्हणून याकडे नक्कीच बघता येईल. या चित्रपटाच्या कलाकारांनी, ज्यामध्ये विक्रांत मॅसी मुख्य भूमिकेत आहे, त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची माने जिंकून घेतली आहेत तसेच सर्वत्र अभिनेत्याचं कौतुक होत आहे.

 

About Marathi E Batmya

Check Also

Mohe-Lagi-Lagan-SUN-Neo

सन निओची नवीन सादरीकरण, “मोहे लागी लगन”, सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आकर्षित करेल ज्योतिष आणि वास्तू दोषावर आधारीत मार्गदर्शन करणारी सिरीयल

सन निओ त्यांच्या प्रेक्षकांना “मोहे लागी लगन” हा शो घेऊन येत आहे. प्रसिद्ध ज्योतिषी भावना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *