Breaking News

अभिनेत्री “सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहिर इक्बाल” नांदा सौख्यभरे नोंदणी पध्दतीने विवाह सोहळा संपन्न

मागील काही दिवसांपासून अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या आणि चित्रपट अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहिर इक्बाल यांच्या लग्नाच्या चर्चेने समाज माध्यमात विविध पध्दतीने चर्चा होत होत्या. तर हिंदूत्ववाद्यांकडून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहिर इक्बाल यांच्या विरोधात ट्रोल मोहिम राबविली जात होती. मात्र या ट्रोल वाल्यांना जराही भीक न घालता आज नियोजित २३ जून रोजी सोनाक्षी सिन्हा आणि झहिर इक्बाल यांनी नोंदणी पध्दतीने विवाह बंधनात अडकले.

देशात धार्मिक धुव्रीकरण करत अल्पसंख्याक समाजाच्या विरोधात हिंदू समाजाला आक्रमक बनविण्याचा प्रयत्न भाजपाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकसभा निवडणूकीत करून पाहिला. मात्र या धुव्रीकरणाचा भाजपाला तोटाच झाल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहिर इक्बाल यांच्या विवाहाला महत्व आले आहे. यापूर्वी अभिनेत्री स्वरा भास्करा या अभिनेत्रीनेही एका मुस्लिम कार्यकर्त्याशी लग्न केले. त्यावेळीही समाजमाध्यमांवर हिंदूत्वावाद्यांकडून अशाच पध्दतीने स्वरा भास्करला ट्रोल करण्यात आले होते.

सोनाक्षी सिन्हा आणि झहिर इक्बाल यांच्या लग्नाचे विधी शुक्रवारपासूनच सुरु करण्यात आले होते. लग्न समारंभाच्या पहिल्या दिवशी मेहंदीचा कार्यक्रम शत्रुघ्न सिन्हा यांच्या रामायणा या निवासस्थानी पार पडला. तसेच आज लग्नाच्या दिवसाचे औचित्य साधत एका पूजेचे आयोजनही करण्यात आले होते. दोघांचा विवाह सोहळा नोंदणी पध्दतीने पार पडला यावेळी सोनाक्षी सिन्हा हिने पांढऱ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली होती. तसेच कानात बांगड्या अगदी मॅचिंग केल्या होत्या. तर झहिर इक्बालने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होता.

या सोहळ्यानंतर सोनाक्षी सिन्हाने लग्नाचे फोटो तिच्या सोशल मिडीयातील खात्यावर शेअर केले. यावेळी सोनाक्षी सिन्हाने आपल्या भावना प्रकट करताना म्हणाली की, सात वर्षापूर्वी याच दिवशी आम्ही एकमेकांच्या डोळ्यात आम्ही प्रेम पाहिलं होतं आणि ते प्रेम टीकविण्याचा निर्णय घेतला. आज त्या प्रेमानं आम्हाला आव्हानांमध्ये आणि यशामध्ये मार्गदर्शन करत या क्षणापर्यंत आणलं. दोन्ही कुटुंबाच्या आणि आमच्या देवांच्या आशीर्वादाने आता आम्ही नवरा बायको झालो आहोत असे सांगत या शब्दांच्या खाली सोनाक्षी आणि झहिर असे लिहायला मात्र सोनाक्षी सिन्हा विसरली नाही.

Check Also

अरुणा इराणी, रविंद्र महाजनी, मिथुन चक्रवर्ती, हेलन यांनाही पुरस्कार जाहिर

महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा “महाराष्ट्र भूषण” पुरस्कार येत्या गुरूवारी दिनांक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *