आलिया आणि वरूण बनले नंबर वन स्कोर ट्रेन्ड्स इंडिया लिस्ट रिपोर्ट

मुंबई : प्रतिनिधी

बॉलीवूड अभिनेता वरूण धवनची त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ऑक्टोबर चित्रपटामूळे सध्या सर्वत्र प्रशंसा होत आहे. कदाचित याच कारणामुळे आठवड्याच्या स्कोर ट्रेड्स इंडियाच्या यादीत वरूणने पहिल्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता होण्याचा मान पटकावला आहे. वरूण अभिनेत्यांच्या यादीत नंबर वन बनला आहे, तर तरूणाईवर सध्या अधिराज्य गाजविणारी आलिया भट नंबर वन अभिनेत्री बनली आहे.

अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर अभिनेत्यांच्या यादीत १२.५२ गुणांसह वरूण ‘युथफुल’ अभिनेत्यांमध्ये आघाडीवर आहे. तर आलिया भट ७६.२२ गुणांसह ‘युथफुल’ अभिनेत्रींमध्ये नंबर वन आहे.

‘ऑक्टोबर’ सिनेमाबद्दल आणि त्यातील वरूणच्या भूमिकेबद्दल सध्या फेसबुक, ट्विटर आणि व्हायरल न्यूजसारख्या सोशल मीडियावर भरपूर लिहीलं जातंय. तर आलिया भटच्या ‘राजी’ सिनेमाचा सध्या फस्ट लूक आऊट झाला आहे. या सिनेमात ती गुप्तहेराच्या भूमिकेत असल्याने चित्रपटाची चांगलीच चर्चा होत आहे. त्यामुळेच तर बॉलीवूड हार्टथ्रोब वरूण पहिल्या क्रमांकावर तर  रणवीर सिंह दूसऱ्या स्थानी, सिध्दार्थ मल्होत्रा तिसऱ्या स्थानी आणि टाइगर श्रॉफ चौथ्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे आलिया आणि दूसऱ्या क्रमांकावर असलेल्या दीपिका पदुकोणमध्ये ३८ गुणांचं अंतर आहे. तिसऱ्या स्थानावर सोनाक्षी आणि चौथ्या स्थानावर सोनम कपूर आहे.

हि माहिती १४ भारतीय भाषांमधील ६००हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून गोळा करण्यात आली आहे. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममुळे या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते.

 

About Editor

Check Also

One-battle-after-another-Movie

Oscar 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अदर’ ने सर्वोत्कृष्ट चित्रपट जिंकला, फक्त सहा पुरस्कार जिंकले

Oscar 2026: ९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत पॉल थॉमस अँडरसनचा “वन बॅटल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *