‘बडुंबा…’मध्ये दिसणार अमिताभ-ऋषी यांची केमिस्ट्री लंबुजी आणि टिंबुजीवरील गाणे नुकतेच चित्रीत

मुंबई : प्रतिनिधी

अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर हे हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते ‘१०२ नॅाट आऊट’ म्हणत जवळजवळ २७ वर्षांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ‘१०२ नॅाट आऊट’ या सिनेमामध्ये दोघेही खूप वेगळ्या गेटअपमध्ये आपल्या चाहत्यांना भेटणार आहेत. ‘१०२ नॅाट आऊट’च्या शूटनंतर याच सिनेमातील ‘बडुंबा…’ या गाण्याच्या लाँचसाठी अमिताभ-ऋषी पुन्हा एकत्र आले.

‘१०२ नॅाट आऊट’मधील ‘बडुंबा…’ हे धमाल गाणं नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं कोणत्याही प्रसिद्ध गायकाने गायलं नसून अमिताभ आणि ऋषी या दोघांच्याच आवाजात ध्वनीमुद्रीत करण्यात आलं आाहे. अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेल्या या गाण्यात अमिताभ यांचं नृत्यही पाहायला मिळतं. ऋषी कपूर यांनी या सिनेमात ७५ वर्षांच्या व्यक्तीची भूमिका साकारली असून अमिताभ त्यांचे वडील बनले आहेत. कायम दु:खी असणाऱ्या आपल्या मुलाला लाईफ एन्जॅाय करण्याचा मेसेज देण्यासाठी अमिताभ हे गाणं म्हणतात अशी ‘१०२ नॅाट आऊट’च्या कथेत एक प्रसंग आहे. या गाण्यात अमिताभ जणू ऋषी यांना आनंदी जीवन जगण्याचा मंत्रच देताना दिसतात. याउलट ऋषी त्यांना आपल्या वयाचा विचार करून जगायला सांगतात. थोडक्यात काय तर या गाण्याच्या निमित्ताने रसिकांना अमिताभ-ऋषी यांची ‘कुली’ या सिनेमातील तीच हिट केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.

‘बडुंबा…’ या गाण्याच्या लाँच प्रसंगी अमिताभ आणि ऋषी यांनी हे गाणं म्हणत उपस्थितांची दादही मिळवली. या सोहळ्याला दिग्दर्शक उमेश शुक्लांसह सोनी पिक्चर्स इंडीयाचे एमडी विवेक कृष्णानीसुद्धा उपस्थित होते.

About Editor

Check Also

One-battle-after-another-Movie

Oscar 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अदर’ ने सर्वोत्कृष्ट चित्रपट जिंकला, फक्त सहा पुरस्कार जिंकले

Oscar 2026: ९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत पॉल थॉमस अँडरसनचा “वन बॅटल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *