‘ख्वाडा’च्या दिग्दर्शकाचा ‘बबन’ तरूण पिढीच्या भावविश्वाच चित्रण पाह्यला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी

२०१५ च्या राष्ट्रीय पुरस्कारासोबतच राज्य सरकारच्या पुरस्कार सोहळ्यात ‘ख्वाडा’ या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट नवोदित आणि सर्वोत्कृष्ट ग्रामीण दिग्दर्शकाचे पुरस्कार पटकावले आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे हा आहे तरी कोण? याचा शोध सुरू झाला. अतिशय बिकट परिस्थितीत जमिन आणि कांदे विकून भाऊरावने ‘ख्वाडा’ सिनेमा बनवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. राष्ट्रीय पुरस्कारांचा वर्षाव झाल्यावर भाऊराव जणू वन नाईट स्टारच बनला. या यशानंतर भाऊ काय करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. यशाला गवसणी घातल्यानंतर भाऊ एखादा शहरी मसालापट वगैरे बनवेल अशी बऱ्याच जणांना अपेक्षा होती, पण भाऊ पुन्हा आपल्या मातीतीलच सिनेमा बनवला आहे.

मागील वर्षभरापासून भाऊ ‘बबन’ या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र होता. २३ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील गाणी यापूर्वीच सिनेरसिकांच्या भेटीला आली असून, नुकताच ‘बबन’चा ट्रेलरदेखील सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आला आहे. आजच्या तरुण पिढीचं भावविश्व मांडणाऱ्या या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट असून चित्राक्ष फिल्म्सने याची निर्मिती केली आहे. ‘ख्वाडा’मधून नावारूपास आलेल्या अभिनेता भाऊसाहेब शिंदेची यात प्रमुख भूमिका असून, त्याच्यासोबतीला गायत्री जाधव हि नवोदित अभिनेत्री झळकणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये भाऊसाहेब जरी गावरान युवकाच्या भूमिकेत असला, तरी ‘ख्वाडा’मधील व्याक्तीरेखेपेक्षा ‘बबन’मधील भूमिका खूप वेगळी आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये प्रेम आणि संघर्ष अशा दोन्ही बाजू पाहायला मिळतात. ग्रामीण जीवनातील संघर्ष आणि कुरघोड्यादेखील या ट्रेलरमध्ये असल्यामुळे, हा सिनेमा प्रेमाच्या गुलाबी थंडीबरोबरच वास्तविक जीवनातील दाह लोकांसमोर घेऊन येत असल्याचं जाणवतं. या सिनेमाच्या निर्मितीची धुरा विठ्ठलराव कऱ्हाडे, प्रमोद भास्कर चौधरी, मोनाली संदीप फंड आणि भाऊसाहेब शिंदे या चौकडीने सांभाळली आहे.

About Editor

Check Also

Actor Pran

Actor Pran : प्रत्येक भूमिकेत ‘प्राण’ ओतणारे बरखुर्दर – प्राण कृष्ण सिकंद फाळणीनंतर भारतात परतल्यावर नवीन इनिंगसाठी आठ महिने वाट पाहावी लागली.

हिंदी चित्रपटसृष्टीने अनेक हुशार कलाकार पाहिले आहेत, पण आज आपण अशा कलाकाराबद्दल बोलत आहोत ज्याने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *