बाळासाहेबां सारखा दुसरा स्टार नाही

अभिनेता आमिर खान यांचे मत

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र आणि मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार नसल्याचे मत हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेता आमिर खान यांने व्यक्त केले. लवकरच बहुचर्चित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ ठाकरे ’ हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट निर्माते, बड्या बँनरचे चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याबाबतचा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आमिरने वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

मंत्रालयातील पत्रकार कक्षात वैद्यकीय शिक्षण विभाग आणि डॉ. संजय बोरूडे यांच्यावतीने लठ्ठपणावरील चाईल्ड ऑबसेटी या संकेतस्थळाचे उद्घाटन आमिर खान याच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन आणि डॉ.संजय बोरूडे उपस्थित होते.

इतर कलाकारांचे वर्षभरात दोन वेळा किमान चित्रपट प्रदर्शित होतात. मात्र माझा दोन वर्षातून एकदा चित्रपट प्रदर्शित होतो. मी सर्वाधिक माझा वेळ पाणी फाऊंडेशनसाठी देत असून उर्वरीत वेळ चित्रपटासाठी देत असल्याचे त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

ऐश्वर्या रॉय बच्चनला आयकर कर खटल्यात मिळाला विजय ४ कोटी रूपयांचा कर वाचला

आयकर अपीलीय न्यायाधिकरण (ITAT) मुंबईने ४ कोटी रुपयांच्या परवाना रद्द करण्याच्या बाजूने निकाल दिल्यानंतर ऐश्वर्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *