सावधान! ‘बेलनवाली बहू’येतेय सास-बहू बरोबर भूत ही पाह्यला मिळणार

मुंबई : प्रतिनिधी

सासू-सून आणि टिव्हीवरील मालिका यांचं नातं अतूट आहे. जमाना कितीही बदलला तरी या नात्यावर नवनवीन मालिका येतच राहणार यात शंका नाही. आजतागायत छोट्या पडद्याने प्रेक्षकांना सुनांची वेगवेगळी रूपं दाखवली आहेत. अगदी सासवांना न जुमानणाऱ्या सुनांपासून तुलसीसारखी सात्विक स्वभावाची सूनही प्रेक्षकांनी पाहिली आहे. पण जमाना बदलतोय तसं सूनेचं रूपडंही बदलत आहे. यालाच अनुसरून आता प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ‘बेलनवाली बहू’.

या मालिकेत क्रिस्टल डिसूझा शीर्षक भूमिकेत म्हणजेच बेलनवाली बहूच्या रूपात दिसणार आहे. या मालिकेत ती रूपा अवस्थी ही व्यक्तिरेखा साकारतेय. तिच्या जोडीला या मालिकेचे लेखक, निर्माते, अभिनेते धीरज सरना प्रमुख भूमिका साकारत आहेत. क्रिस्टलने साकारलेली रूपा आणि तिच्या मृत पतीच्या भूताची म्हणजेच अमरनाथची अनोखी केमिस्ट्री या मालिकेत पाहायला मिळेल. ही सूनबाई काहीशी वेंधळी असली तरी अतिशय प्रेमळ आहे. असं असलं तरी ती येणाऱ्या कोणत्याही सामना करण्यासाठी सज्ज असते. ही जरी वेंधळी असली तरी आजच्या जमान्यातील सूनेचं प्रतिबिंब हिच्या ठायी पाहायला मिळणार असल्याचं क्रिस्टल मानते.

एक वेंधळी पण प्रेमळ सून, तिचा दुर्दैवी नाखूष पती, एक अकार्यक्षम पण आनंदी परिवार आणि त्यात बेलनची असणारी प्रमुख भूमिका असं अनोखं कथानक असलेली ही मालिका १५ जानेवारीपासून कलर्स वाहिनीवर सुरू होणार आहे. सोमवार ते शुक्रवार रात्री १०:३० वाजता प्रसारीत होणाऱ्या या मालिकेची निर्मिती शून्य स्क्वेअर या संस्थेअंतर्गत करण्यात येत असून दिग्दर्शनाची धुरा देवेन भोजानीने सांभाळली आहे. वेद राज यांनी संचालन केले आहे.

 

About Editor

Check Also

आशिष शेलार यांचे मत, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जीवनगाथा जगासमोर यावी खंजिरीचे बोल चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्यावेळी बोलताना व्यक्त केली भावना

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार, कार्य आणि जीवनगाथा जगासमोर यावी, अशी राज्य शासनाची आणि सांस्कृतिक कार्य विभागाची भूमिका …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *