एव्हेरग्रीन स्माईलवाली रेणूका नव्या रूपात दिसणार

मुंबई : प्रतिनिधी

काही कलाकार नेहमीच वेगळ्या धाटणीच्या भूमिकांच्या शोधात असतात. मराठीसोबतच हिंदीतही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या काही मराठी कलाकारांचाही यात समावेश आहे. मोजके आणि निवडक चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या रेणुका शहाणे या मराठमोळ्या गुणी अभिनेत्रीचाही समावेश या कलाकारांच्या यादीत आहे. राजश्री प्रोडक्शनच्या ‘हम आपके है कौन’ या गाजलेल्या चित्रपटात सलमान खानच्या भाभीच्या रूपात प्रकाशझोतात आल्यानंतरही रेणुकाने निवडक चित्रपटच केले. याच कारणामुळे रेणुकाचा सिनेमा म्हणजे काहीतरी वेगळेपण असणार असं जणू समीकरणच बनून गेलं. हिच रेणुका आता पुन्हा एकदा नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘३ स्टोरीज’ या आगामी हिंदी चित्रपटात रेणुकाच्या चाहत्यांना तिचा हटके लुक पाहायला मिळेल. अर्जुन मुखर्जींनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात रेणुका गोव्यातील एका वयोवृद्ध महिलेच्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. हि व्यक्तिरेखा गोव्यातील असल्याने रेणुकाला टिपीकल गोवन स्टाइलचा गेटअप करण्यात आला आहे. बऱ्याचदा साडीत दिसणारी रेणुका या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच गोवन वेशात दिसेल. गळ्यात क्रॉस, डोळ्यांना चष्मा आणि बॉयकटच्या सहाय्याने या लुकमध्ये वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटात रेणुकासोबत शरमन जोशी, पुलकित सम्राट, रिचा चढ्ढा आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत.

About Editor

Check Also

One-battle-after-another-Movie

Oscar 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अदर’ ने सर्वोत्कृष्ट चित्रपट जिंकला, फक्त सहा पुरस्कार जिंकले

Oscar 2026: ९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत पॉल थॉमस अँडरसनचा “वन बॅटल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *