संजय नार्वेकर, सिध्दार्थ जाधवचा ये रे ये रे पैसा पहिल्यांदाच प़डद्यावर एकत्र

मुंबई : प्रतिनिधी

दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करीत रसिकांना सिनेमागृहांपर्यंत खेचून आणण्याचं कठीण कार्य झी स्टुडिओजच्या चित्रपटांनी नेहमीच केलं आहे. याच कारणामुळे झी स्टुडिओजचा सिनेमा म्हणजे निखळ मनोरंजन असं जणू समीकरणच बनून गेलं आहे. झी स्टुडिओजनेही मागील काही वर्षांपासून नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात चित्रपट प्रदर्शित करण्याची परंपरा जपली आहे. २०१८ हे वर्षही याला अपवाद नाही. यंदा ‘ये रे ये रे पैसा’ या मराठी सिनेमाच्या रूपात झी स्टुडिओज मनोरंजनाचा धमाका करण्यासाठी सज्ज झालं आहे.

दुनियादारी या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडिओज आणि कॅमेरामन-दिग्दर्शक संजय जाधव ही द्वयी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याकरिता पुन्हा एकदा एकत्र आली आहे. संजय जाधव दिग्दर्शित, झी स्टुडिओजचा नवा कोरा मराठी चित्रपट ये रे ये रे पैसा नववर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांचं दिलखुलास मनोरंजन करणार आहे. नटरंग, टाईमपास, लोकमान्य, नटसम्राट, ती सध्या काय करते अशा दर्जेदार कलाकृती देणाऱ्या झी स्टुडिओज् प्रस्तुत ये रे ये रे पैसा हा चित्रपट नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजेच ५ जानेवारी २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते संजय नार्वेकर आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी तसेच अवघ्या महाराष्ट्राचे लाडके आणि सुप्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ जाधव, उमेश कामत आणि तेजस्विनी पंडित हे प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.

चित्रपटाची कथा आहे पाच माणसांची आणि त्यांच्या सोबत घडणाऱ्या गमतीदार गैरसमजाची. उमेश, तेजस्विनी, सिद्धार्थ, संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी म्हणजेच आदित्य, बबली, सनी, अण्णा आणि जान्हवी या पाच जणांच्या आयुष्यात घडणारी एक घटना त्यांना विचित्रप्रकारे एकमेकांसमोर आणते. आपापल्या आयुष्यात या ना त्या कारणाने पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या मागे पळत असताना होणाऱ्या भन्नाट गैरसमजांची आणि बनवाबनवीची रुपेरी पडद्यावर घडणारी मनोरंजनात्मक कॉमेडी म्हणजे ये रे ये रे पैसा.

अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओ प्रायवेट लिमिटेड आणि पर्पल बुल एंटरटेनमेंट यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून झी स्टुडिओज् ची प्रस्तुती आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संजय जाधव यांचे असून, संवाद आणि पटकथा अरविंद जगताप यांचे आहेत. चित्रपटाचं संकलन केलंय अपूर्वा मोतीवाले आणि आशिष म्हात्रे यांनी तसेच छायाआरेखन आहे पुष्पांक गावडे यांचं. महेश साळगावकर यांचे कला दिग्दर्शन असून पंकज पडघन यांचे पार्श्वसंगीत आहे.

About Editor

Check Also

One-battle-after-another-Movie

Oscar 2026 : ‘वन बॅटल आफ्टर अदर’ ने सर्वोत्कृष्ट चित्रपट जिंकला, फक्त सहा पुरस्कार जिंकले

Oscar 2026: ९८ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीत पॉल थॉमस अँडरसनचा “वन बॅटल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *