अखेर सारानेच मारली बाजी सारा बनली सिम्बागर्ल

मुंबई : प्रतिनिधी

जवळजवळ महिनाभरापूर्वी ‘कोण बनणार रणवीरची नायिका?’ या मथळ्याखाली आम्ही एक बातमी दिली होती. यात रणवीर सिंहची नायिका कोण बनणार आणि या शर्ययीत कोणत्या अभिनेत्री आहेत याबाबत सांगितलं होतं. संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावत’नंतर झोया अख्तरच्या ‘गल्ली बॅाय’या सिनेमामुळे रणवीर सध्या चर्चेत आहे. असं असलं तरी रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या ‘सिम्बा’बाबतची उत्सुकताही दिवसेंदिवस वाढत आहे.

करण जोहरची निर्मिती असलेल्या आगामी ‘सिम्बा’मध्ये रणवीर मुख्य भूमिकेत असून, त्याचा फर्स्ट लुक फार पूर्वीच प्रकाशित करण्यात आला आहे. पण या सिनेमात त्याची नायिका कोण बनणार याचं उत्तर कोणालाच ठाऊक नव्हतं. या शर्यतीत एकीकडे श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची कन्या जान्हवी कपूर, तर दुसरीकडे सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची कन्या सारा अली खान या दोघी सामील असल्याची चर्चा रंगत होती. त्यामुळे रणवीरची नायिका बनण्याच्या शर्यतीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आता हे रहस्य उघड करण्यात आलं आहे.

मागील बऱ्याच दिवसांपासून ‘सिम्बा’च्या नायिकेचा शोध सुरू होता. बऱ्याच विचाराअंती ‘सिम्बा’साठी साराला फायनल करण्यात आल्याचं रोहित आणि करण यांनी नुकतंच जाहिर केलं आहे. त्यामुळे कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातच साराची जोडी रणवीरसोबत जमली आहे. २८ डिसेंबर २०१८ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात रणवीर एका पोलिस अधिकाऱ्याच्या भू्मिकेत दिसणार असून, त्याचं सिनेमातील नाव संग्राम भालेराव उर्फ सिम्बा आहे. सारा सध्या ‘केदारनाथ’ या आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणात बिझी आहे. त्यानंतर ती ‘सिंबा’साठी वेळ देणार असल्याचं समजतं. रोहितच्या या अॅक्शन-कॅामेडीपटात रणवीर-साराची केमिस्ट्री कशी जुळते ते पाहायचं आहे.

 

About Editor

Check Also

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती, सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली नवीन कामगार संहितेच्या अनुषंगाने नवी नियमावली

नवीन कामगार संहितेच्या अनुषंगाने   सिने कलाकारांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येणार असून नियमावलीचा मसूदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *