मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्र बनले परकीय गुंतवणूकदारांची पहिली पसंती २०२४-२५ मध्ये देशाच्या ४० टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात

महाराष्ट्राने पुन्हा एकदा परकीय गुंतवणुकीत देश पातळीवर आघाडी घेतली आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात एकूण १,६४,८७५ कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक देशात आलेल्या एकूण ४,२१,९२९ कोटी रुपयांपैकी तब्बल ४० टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात ३२ टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गत आर्थिक वर्षात (जानेवारी ते मार्च २०२५) शेवटच्या तिमाहीत २५,४४१ कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. हे वर्ष महाराष्ट्रासाठी विक्रमी ठरले असून, मागील १० वर्षांतील सर्वोच्च परकीय गुंतवणुकीचा नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. विशेष म्हणजे, हा उच्चांक आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांतच पार झाला असल्याचे सांगितले.

या ऐतिहासिक आणि विक्रमी गुंतवणुकीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वाखाली राज्याची प्रगती अशीच सुरू राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

मागील दशकातील परकीय गुंतवणुकीचा आढावा (कोटी रुपयांमध्ये) :

२०१५-१६ : ६१,४८२ कोटी

२०१६-१७ : १,३१,९८० कोटी

२०१७-१८ : ८६,२४४ कोटी

२०१८-१९ : ५७,१३९ कोटी

एप्रिल ते ऑक्टोबर २०१९ : २५,३१६ कोटी

२०२१ : १,१९,७३४ कोटी

२०२१-२२ : १,१४,९६४ कोटी

२०२२-२३ : १,१८,४२२ कोटी

२०२३-२४ : १,२५,१०१ कोटी

२०२४-२५ : १,६४,८७५ कोटी

About Editor

Check Also

Rolls-Royce

Rolls-Royce: आता रोल्स-रॉइस भारतीय बाजारपेठेत धावेल रोल्स-रॉइसचे सीईओ एर्गिनबिल्जिक यांनी सांगितले की, कंपनीची महत्त्वाकांक्षा भारताला रोल्स-रॉइससाठी घरगुती बाजारपेठ बनवण्याची आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रोल्स-रॉइसचे सीईओ तुफान एर्गिनबिल्जिक Rolls-Royce यांची भेट घेतली आणि सांगितले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *