मँग्नेटीक महाराष्ट्र मधून १० लाख कोटींच्या गुंतवणूकीची अपेक्षा पंतप्रधान मोदींच्या हस्ते मँग्नेटीक महाराष्ट्रचे उद्घाटन : उद्योगमंत्र्याची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढविण्यासाठी मँग्नेटीक महाराष्ट्र कर्न्वजन्स-२०१८ चे १८ ते २० फेब्रुवारी २०१८ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात १० लाख कोटी रूपयांची गुंतवणूकीचे लक्ष्य असून ४ हजार ५०० कंपन्यांबरोबर सामंज्यस करार करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत एमआयडीसीचे मुख्याधिकारी सुनिल सेठी, उद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनिल पोरवाल उपस्थित होते.

हा कार्यक्रम एमएमआरडीएच्या मैदानावर आयोजित करण्यात आला असून यामाध्यमातून रोजगार निर्मिती, स्थिरता, पायाभूत सुविधा आणि भविष्यकालीन उद्योगांवर भर देण्यात येणार आहे. मँग्नेटीक महाराष्ट्र ही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची एक संधी निर्माण करणारे ठरणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमामध्ये व्हर्जिन अँटलांटीकचे रिचर्ड ब्रँनसन, लुम्बिरघोनी मोटार्सचे टोमिनो लोम्बिरघोनी, इमरस्नचे इलेक्ट्रीक कंपनीचे अध्यक्ष हँण्डे डिल्टेमिज, हयसँग कंपनी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे आदी प्रमुख उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

About Editor

Check Also

ईपीएफओच्या व्याज दरात काहीही बदल नाही २०११-१२ मधील व्याजदर ८.२५% चालू वर्षातही

सेवानिवृत्ती निधी संस्था ईपीएफओ EPFO ​​ने सोमवारी (२ मार्च २०२६) कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (EPF) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *