नेस्ले प्रथमच करणार स्टॉक स्प्लिट १४० रुपये लाभांशही देणार

स्विस कंपनी नेस्लेचे भारतीय युनिट नेस्ले इंडिया प्रथमच आपले शेअर्सचे विभाजन करणार आहे. याशिवाय कंपनीने आर्थिक निकालांसह लाभांशही जाहीर केला. नेस्ले इंडियाने गुरूवारी आपले दुसऱ्या तिमाहीतील निकाल जाहीर केले. यावेळी नेस्ले इंडियाने लाभांशही जाहीर केला आहे. नेस्ले इंडियाच्या संचालक मंडळाने २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर १४० रुपये या दुसऱ्या अंतरिम लाभांश देण्यास मान्यता दिली आहे.

नेस्लेने एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की, १० रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स १:१० च्या प्रमाणात विभागले जातील. मात्र, त्यासाठीची रेकॉर्ड डेट अद्याप ठरलेली नाही. स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर शेअर्सचे दर्शनी मूल्य १ रुपये होईल. स्टॉक स्प्लिटमुळे मार्केटमधील शेअर्सची संख्या वाढते. स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर नेस्लेच्या पोर्टफोलिओमधील शेअर्सची संख्या १० पट वाढेल.

स्टॉक स्प्लिट व्यतिरिक्त नेस्ले इंडियाने सप्टेंबर तिमाही निकालांसह या आर्थिक वर्ष 2023-24 साठी दुसरा अंतरिम लाभांश देखील जाहीर केला आहे. कंपनी प्रत्येक शेअरवर १४० रुपये वितरित करेल आणि यासाठी १,३४९.८२ कोटी रुपये खर्च केले जातील. त्याचे पेमेंट १६ नोव्हेंबरपासून केले जाईल. या आर्थिक वर्षासाठी २७ रुपयांचा अंतरिम लाभांश यापूर्वीच वितरित केला आहे.

सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक ३६ टक्क्यांनी वाढून ९०८ कोटी रुपयांवर गेला आहे आणि महसूल ९.६ टक्क्यांनी वाढून ५,०३६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. नेस्ले इंडियाची देशांतर्गत विक्री सप्टेंबर तिमाहीत १०.३ टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुरेश नारायणन म्हणाले की, नेस्ले इंडियाने ५००० कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा ओलांडला आहे. कंपनीने कोणत्याही तिमाहीत प्रथमच ही पातळी ओलांडली आहे.

About Editor

Check Also

भारतीय शेअर बाजार जोरदार तेजीसह बंद, रिअल्टी आणि ऑटो शेअर्समध्ये खरेदी

आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार जोरदार तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स ४४७.५५ अंकांनी म्हणजेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *