ऑन डोअर कॉन्सेप्टचा आयपीओ २३ ऑक्टोबरला उघडणार इतकी आहे प्राईस बँड

मध्य प्रदेश स्थित ओमनी-चॅनल रिटेलर ऑन डोअर कॉन्सेप्टचा आयपीओ २३ ऑक्टोबर रोजी गुंतवणुकीसाठी उघडणार आहे. कंपनी या आयपीओतून ३१.१८ कोटी रुपये उभारणार आहे. हा आयपीओ २७ ऑक्टोबरपर्यंत खुला आहे. ऑक्टोबरमध्ये एसएमई विभागातील हा पाचवा आयपीओ आहे.

ऑन डोअर कॉन्सेप्टने आयपीओसाठी प्रति शेअर २०८ रुपये किंमत निश्चित केली आहे. आयपीओअंतर्गत १४.९८ लाख नवीन शेअर्सची विक्री केली जाईल. कंपनीने २५९ रुपये प्रति शेअर दराने २,८५,२०० शेअर्सच्या प्री- आयपीओ प्लेसमेंटद्वारे ७.३९ कोटी रुपये उभारल्यानंतर आयपीओ आकार कमी करण्यात आला.

ऑन डोअर कॉन्सेप्टने मार्केट मेकरसाठी ८६,४०० शेअर्स राखीव ठेवले आहेत. उर्वरित १४,१२,४०० शेअर्स इतर गुंतवणुकदारांसाठी तर ७,०६,२०० शेअर्स किरकोळ आणि उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्तींसाठी वेगळे ठेवले आहेत. गुंतवणूकदार किमान ६०० शेअर्ससाठी आणि त्यानंतर त्याच्या पटीत बोली लावू शकतात. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १,२४,८०० रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.

यशस्वी गुंतवणूकदारांना १ नोव्हेंबरपर्यंत शेअर्स वाटप होईल. तर ३ नोव्हेंबरपर्यंत शेअर्स यशस्वी गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जमा केले जातील. शेअर्सचे लिस्टिंग ६ नोव्हेंबरला होईल आयपीओतून मिळालेल्या निधीतील २०.४३ कोटी रुपये खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि उर्वरित रुपये ७.२४ कोटी सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी कंपनी वापरेल. सध्याची आणि भविष्यातील वाढ लक्षात घेता, अंतर्गत आधारावर आमच्या कंपनीची एकूण निव्वळ कार्यरत भांडवलाची आवश्यकता आर्थिक वर्ष २०२४ साठी २२.०१ कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे, असे कंपनीने आपल्या प्रॉस्पेक्टसमध्ये म्हटले आहे.

ऑन डोअर कॉन्सेप्ट किराणा सामान आणि घरगुती जीवनावश्यक वस्तूंचे प्रादेशिक किरकोळ विक्रेता आहे. जानेवारी २०१५ मध्ये कंपनीने भोपाळमध्ये पहिले स्टोअर उघडले आणि मार्च २०२३ पर्यंत मध्य प्रदेशातील ५५ टक्के स्टोअरपर्यंत विस्तार केला. कंपनी १७ स्टोअरची मालकी आणि संचालन करते आणि उर्वरित फ्रँचायझी मॉडेलद्वारे चालविली जातात. कंपनी आर्थिक वर्ष २०२३ मध्ये फायदेशीर ठरली. यावर्षी ५.४ कोटी रुपयांच्या तोट्याच्या तुलनेत ०.०६ कोटी रुपयांचा नफा नोंदवला. याच कालावधीत ऑपरेशन्समधील महसूल १७३.१ कोटींवरून १८०.१ कोटी रुपये झाला.

About Editor

Check Also

Rolls-Royce

Rolls-Royce: आता रोल्स-रॉइस भारतीय बाजारपेठेत धावेल रोल्स-रॉइसचे सीईओ एर्गिनबिल्जिक यांनी सांगितले की, कंपनीची महत्त्वाकांक्षा भारताला रोल्स-रॉइससाठी घरगुती बाजारपेठ बनवण्याची आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रोल्स-रॉइसचे सीईओ तुफान एर्गिनबिल्जिक Rolls-Royce यांची भेट घेतली आणि सांगितले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *